एकापेक्षा एक

‘झी’ ने एक अनाऊन्समेंट केली,
ऐकून मनाची चलबिचल झाली,
भाग घ्यायची मी तयारीच केली,
कारण स्पर्धा होती …. एकापेक्षा एक “आजी” आली |

हे आणि मुल म्हणे,
अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ,
‘महागुरुंच्या’ डोळ्यात मावेल कां हा ‘ढग’ ?
पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट,
म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप |

काय नशिब पहा, चक्क मी झाले ‘सिलेक्ट’
आणि कोरीओग्राफरकडे शिकले, डान्स परफेक्ट |
पडले, गडबडले तरी नाही बाळगली तमा,
स्पर्धेसाठी शरीराचा, उतरवला होता न विमा |

बुधवार गुरुवार माझा ‘सेफ’ झोन प्रत्येक,
महागुरुंकडून मिळवले, रुपये ‘शंभर’ कित्येक |
एकेक करुन गाठली ‘महाअंतीम’ फेरी
घरच्यांनी घेतली होती SMS ची जबाबदारी |
बघता बघता निकालाचा ‘क्षण’ येऊन ठेपला
म्हटल दोन लाखांचा चेक नक्कीच ‘आपला’ |

हातातला कागद आता महागुरुंनी वाचला,
आणि विजेती आजी आहे…. आजी आहे…..
ऐकून, सार स्टेज गरागरा फिरल,
पडता पडता मला, कुणी तरी धरलं |

डोळ्यावर सपकन पाणी मारलं,
झाली वाटतं जागी, कानानी हेरलं
बाजूलाच उभे होत ‘महागुरु’ घरचे,
स्वप्नच कां शेवटी, “बिच्चारा आजीचे” |

— सौ. अलका वढावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..