Web
Analytics
एक काल्पनीक पत्र – Marathisrushti Articles

एक काल्पनीक पत्र

प्रिय भारत,
काय बर आहे ना? नाही म्हटलं तुझा वाढदिवस जवळ येतोय म्हणून म्हटलं थोडी विचारपुस करावी तुझी.  काय आहे या सोशल मिडिया नसलेल्या जमान्यात तु स्वतंत्र झालास पण आता याच सोशल मिडियावर तुझ्याबद्दल काही लिहीलं नाही तर एक वेगळाच शिक्का बसण्याची भिती असते रे.
(अहं तुझी नव्हे, तुलाही माहित आहे कोणाची ते)
तुझा वाढदिवस असला कि एक वेगळाच आनंद असतो आम्हाला. पण या आनंदावरही कधी कधी विरजण पडु लागतं रे जेव्हा तुझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच…” दिल्लीत भूकेमुळे ३ लहान मुलींचा मृत्यू” असं काही कानी पडलं की. माहित नाही का पण हिम्मत होत नाही रे माझी असं काही ऐकण्याची. तु कसं सहन करतो रे हे सगळं?
मला नाही वाटत तुलाही हे सहन होत असेल. तुलाही वाटत असेल ओरडावं आपणही इथल्या बहीऱ्या झालेल्या सरकारच्या कानठळ्या बसाव्या इतकं. तुलाही वाटतच असेल ना त्या लेकरांसाठी आवाज उठवावा?
म्हणजे बघ ना पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासुन अगदी १०-१५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घरात खायला काही नसल्यामुळे  कोणाचा मृत्यू होतो, तर कधी कधी मृतदेह न्यायला इथे कधी  कोणाला सरकारी रूग्णवाहिका मिळत नाही. का होत असेल रे हे असं?

तु तोच आहेस ना रे  जो दुसऱ्या देशांंनाही कृषीची निर्यात करतो? तु तोच आहेस ना ज्याची  १८% साक्षरता होती १९४७ मध्ये आणि आता ७४% च्या आसपास पोहोचलास तु . कुठे गेली रे मग ही साक्षरता? अर्थात शिक्षणाने साक्षरता येते पण सुशिक्षित प्रगल्भता येत नाही त्याला तु तरी काय करणार म्हणा.
काय दोष काय होता रे त्या लहान बाळांचा की तुझ्या कुशीत असतानाही त्यांचा फक्त भुकेमुळे मृत्यू व्हावा?   ” त्या बाळांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता” असं ऐकुन तुलाही  त्या रात्री जेवण गेलं नसणार हेही  कळतयं रे मला.

          इच्छाच होत नाहीये रे काही बोलण्याची.  पण काय करणार हे ऐकुन मन अगदी सुन्न झालयं. म्हणून हे थोडसं बोलुन गेलोय. आणि हो काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने  माफ कर.!!!
तुझाच,
( नाव सांगणंं गरजेचचं आहे का? )

© समाधान आहेर
७२७६८१७६७१

लेखकाचे नाव :
समाधान दिलीप आहेर
लेखकाचा ई-मेल :
samadhana555@gmail.com

About Guest Author 512 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…