नवीन लेखन...

आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर

*वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले.

*दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वादुिपडाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.

*१९६० च्या सुमारास हॅलोथेन व मेथोक्झायफ्लुरेन या दोन औषधांचा वापर त्यांनी भूल देण्यासाठी सुरू केला होता. नंतर एनफ्लुरेन व आयसोफ्लुरेन यांचा वापर १९७० मध्ये, तर डेस्फ्लुरेनचा वापर १९९० मध्ये सुरू झाला.

*शस्त्रक्रियेत रुग्णाच्या हालचाली थांबवण्याची गरज असते, त्याकरिता भूल आवश्यक ठरते. त्यातही कमीत कमी औषध वापरून हा परिणाम साधण्याचे ‘मिनिमम अलव्हेलॉर कॉन्स्ट्रेशन’ तंत्र त्यांनी विकसित केले.

* आजपर्यंत त्यांनी ठरवून दिलेली औषधांची मात्राच भूल देताना प्रमाण मानली जात आहे. भुलीचे काम संपल्यानंतर या औषधांचा परिणाम पटकन संपवणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांनी श्वासातून दिली जाणारी भुलीची औषधे कशी द्यायची याचे काही नियमही सांगितले होते. आजही त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेली आयसोफ्लुरेन, सेव्होफ्लुरेन, डेसफ्लुरेन ही औषधे भूल देण्यासाठी वापरली जातात.

*एडमंड यांचा जन्म १९३० मध्ये शिकागोत झाला. त्यांचे वडील जाहिरात व्यवसायात होते. वयाच्या सहाव्या वर्षी एडमंड यांना ईथरच्या मदतीने भूल देण्यात आली होती तेव्हा त्यांना जे अनुभव आले त्यातूनच त्यांनी भूलशास्त्रात काम करण्याचे निश्चित केले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते हाईड पार्क स्कूलमधून पदवीधर झाले. अभ्यासात ते फार हुशार नव्हते. महिलांचे बूट विकण्याचा व्यवसाय करीत त्यांनी रुझवेल्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर इलिनॉय विद्यापीठातून रसायनशास्त्र व गणितात पदवी घेतली.

*१९५५ मध्ये नॉर्थवेस्टर्न मेडिकल स्कूलमधून वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली. त्या वेळी आंतरवासीयता पूर्ण करताना एकदा भूलशास्त्रात वापरले जाणारे विशिष्ट थिओपेंटाल दिलेल्या रुग्णाला जवळजवळ मृत्यूने गाठले होते, पण एडमंड यांनी विशिष्ट तंत्र वापरून त्याला वाचवले.

 

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..