नवीन लेखन...

जेष्ठ समाज सेवक डॉ.अभय बंग

डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर आरोग्या समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षे ग्रामीण भागात जाऊन काम केले. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी झाला.  डॉ. अभय बंग हे सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशिप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले. येथे त्यांना डॉ.डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन दिग्गज गुरू म्हणून लाभले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गडचिरोलीतील स्त्रिया व आदिवासींचे आरोग्य, दारू व तंबाखूचे व्यसन, तसेच बालमृत्यू हे प्रश्न सोडविण्यासाठी केला. बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप ((मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅनसेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

डॉ.अभय बंग यांच्या सर्च या संस्थेची वेबसाईट.

Home

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..