नवीन लेखन...

ज्ञानार्जन – शिक्षण म्हणजे जाणिवेची प्रक्रिया

 

शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याबद्दल नाहीये .. खरं पाहता ते माणसाची जाणीव आणि आकलनशक्ती विकसित करण्याबद्दल आहे ..!!

मुलं शिकतात, कारण ती या जगात नवी असतात. त्यांना हे जग समजून घ्यायचं असतं. त्यांना शिकण्यासाठी शिक्षेचीही गरज नसते आणि बक्षिसाचीही नसते. त्यांना आमिष लागत नाही. फक्त त्यांचं कुतूहल शमवणारं चांगलं शिक्षण पाहिजे. शिक्षण नीरस नसावं, मुलांना ते आवडावं, गंमत यावी, त्याचं ओझं वाटू नये, भविष्यात उपयोगी पडावं, परीक्षे पुरतं केलं आणि विसरलं असं नसावं. प्रत्येक विषय मुलांच्या जीवनाशी आणि समाजाशी जोडलेला हवा. नुसते अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिक्षण नव्हे.
 
“प्रत्येक मुलामध्ये असणाऱ्या अंगभूत सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील क्षमतांचा पुरेपूर विकास होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती सभोवताली निर्माण करणे म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न कळणं, शिक्षण म्हणजे चंगळवादापासून दूर राहणं, शिक्षण म्हणजे स्वावलंबी होणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं..”
 
शिक्षणातली सगळी व्यवस्था, त्यातली जबरदस्ती, त्यातली स्पर्धा, त्यातली गाजरं, त्यातल्या छडय़ा, त्यातले दर्जे, अभ्यासक्रम हे सगळं.. सर्व मानवी शोधांमध्ये सर्वात धोकादायक आणि दहशतवादी वाटतं. आज माणसं भीती, हेवा, हव्यास यांच्या हातात हात घालूनच जगतायत. त्यांना असं वाटतं की आपण कायम कशाचे तरी गिऱ्हाइकच असतो. आसपासच्या घटनांकडे आपण प्रेक्षक म्हणून पाहायचं. आपण काही निर्माण करायचं ते शिकण्यासाठी… या जगभरच्या आधुनिक गुलामी वृत्तीची मुळं शिक्षणातच दडली आहेत.
देशाच्या नजरेसमोर असणारी शैक्षणिक स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण नेमके काय करतो आणि किती वेगाने करतो, यावर आपल्या मुलांच्या नशिबी भविष्यात काय येणार हे अवलंबून असेल. आपल्या शाळा या आपल्यासाठी तातडीच्या युध्दक्षेत्रासारखी अस्वस्थ भूमी बनली आहेत. निर्णय त्वरित द्यावे लागतील आणि त्यापेक्षा अधिक गतीने त्यांची अंमलबजावणी करावी लागेल.
 
ही वेळ गमावली तर पुन्हा संधी नाही, अशी कसोटी पाहणाऱ्या टप्प्यावर आपण उभे आहोत. यातून जर अपयश पदरी आले, तर ते इतक्या सहजतेने साऱ्या व्यवस्थेत झिरपत जाईल की, हे युध्द आपण हरलो आहोत हे आपल्याला समजणारदेखील नाही.
 
एकीकडे भारत वेगाने तरुण होतो आहे, तर दुसरीकडे त्याच वेगाने शिक्षणाच्या भोवतीच्या प्रश्नांचा गुंताही वाढत आहे. या प्रश्नांना आपण कसे सामोरे जातो, यावर आपले भवितव्य ठरेल.
 
ज्ञानार्जन
Shyam’s Blog

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..