नवीन लेखन...

दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते जयंत देसाई

दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते जयंत देसाई यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९०९ रोजी झाला.

जयंत देसाई यांचे जयंतीलाल झिनाभाई देसाई हे पूर्ण नाव. जयंत देसाई हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते.मुंबई विद्यापीठातुन पदवी घेतल्यानंतर देसाई १९२९ मध्ये रणजीत स्टुडिओमध्ये रुजू झाले, जिथे त्यांनी सुरुवातीला चंदुलाल शाह यांच्या राजपुतानी आणि नंदलाल जसवंतलाल यांच्या पहारी कन्यासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 1930 मध्ये आलेला चित्रपट नूर-ए-वतन हा त्यांचे पहिले स्वतंत्र दिग्दर्शन असलेला चित्रपट होत. रणजीत फिल्म कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी दोन बदमाश (१९३२), चार चक्रम (१९३२) आणि भूतियो महल (१९३२) या काही चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्य केले. पुढे त्यांनी तुफानी टोली (१९३७), तानसेन (१९४३), हर हर महादेव (१९५०) आणि अंबर (१९५२) यासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तानसेन चित्रपट हा १९४३ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. चित्रपट दिग्दर्शनासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले.१९४३ पर्यंत, देसाई रणजीत स्टुडिओच्या प्रमुख दिग्दर्शकांपैकी एक होते आणि त्यांनी एडी बिलिमोरियाच्या विरुद्ध वीर बब्रुवाहन (१९३४) सारख्या अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. १९४३ मध्ये त्यांनी रणजीत स्टुडिओ सोडून जयंत देसाई प्रॉडक्शन ही स्वतःची निर्मिती कंपनी बनवली.

१९४४ साली जयंत देसाई प्रॉडक्शन्सचा मनोरमा हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शन बॅनरखालील पहिला चित्रपट होता.१९५० साली हिंदू पौराणिक चित्रपट हर हर महादेव ज्यात निरुपा रॉय मुख्य अभिनेत्री होत्या. त्यांनी १९५२ मध्ये राज कपूर आणि नर्गिस अभिनीत अंबर हा चित्रपट दिग्दर्शित केला.तनुजा यांनी अंबर चित्रपटात नर्गिसच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

त्यांच्या बांसुरी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गायक मुकेश व राज कपूर यांची भेट झाली, राज कपूर चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते, या भेटीमुळे मुकेश यांची कारकीर्द प्रस्थापित होण्यास मदत झाली.जयंत देसाई यांनी १९४० साली दीवाली चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनावर आधारित १९४५ साली आलेला ऐतिहासिक चित्रपट सम्राट चंद्रगुप्त दिग्दर्शित केला, तसेच १९४५ मध्येच कुंदन लाल सहगल यांचा चित्रपट तदबीर या चित्रपटात शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यांनी १९३५ मध्ये कॉलेज गर्ल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पुढे स्वतंत्र निर्माता म्हणून त्यांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला ज्युपिटर फिल्म्स आणि हेमलता पिक्चर्सची स्थापना केली.

जयंत देसाई यांचे निधन १९ एप्रिल १९७६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..