देखणी – प्रिया मराठे

प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..

आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

लहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.

प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

प्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.

धनेश पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..