देहातील शक्ति

नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा
थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते

अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून
आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती

आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते
भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती

अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती
धनको ऋणको विद्युतसाठे   अलग अलग दिसती मोठे

विजातीय लिंग येतां जवळी   परिणाम दिसे विजेचा त्यावेळी
प्रकाश आहे आपल्या देही   ज्ञानीजन तो सहज पाही

स्थिर करुन चंचल मना   प्रकाश दिसेल ह्रदयी सर्वाना
उष्णता वीज प्रकाश शक्ति    हींच ईश्वरी रुपें असती

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1566 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…