नवीन लेखन...

‘पिन कोड’ प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर

Creator of Pin Code System of P&T - Shriram Bhikaji Velankar

श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. ते संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते.

श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. कारण ह्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्याकडून मागविलेल्या इतिवृत्तानुसार, सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना संध्याकाळी आपल्या घरी लहान मुलांना जमवून गोष्टी सांगत त्या ऐकायला श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटीश सरकारला कळली होती.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या पत्रव्यवहारासाठी १७२७ मध्ये कोलकात्यात पोस्टाची सेवा चालू केली. भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली.  त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते.

आज दुर्देवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे १ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

6 Comments on ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर

  1. श्रीराम वेलणकरांच्या महान कामगिरीला कोटी कोटी धन्यवाद व
    शतश:प्रणाम.

  2. अशा या मराठी माणसाचा आम्हाला अभिमान आहे. यांचे नातेवाईक असतील तर त्यांच्या बद्दलची पूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यांचे नातेवाईक असतील तर त्यांनी काही गोष्ट उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

  3. I have read artical on Sriram Bhikaji Velankar in Amitmitra Magazine published by Maharashtra Chitpawan Sangh Pune ,then I know the Pin code idiea IS OUR MARATHI CHITPAWAN MANASACHI I will call you and discuss reg. this artical

Leave a Reply to SANTOSH SHRIKANT KUSNALKAR Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..