नवीन लेखन...

ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची…

Creative Imagination is greater than Knowledge

“आईनस्टाईन म्हणायचा ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची .”

हे पटवून देताना कालच्या लोकसत्तातून गिरीश कुबेरनी फारच सुंदर लेख लिहला आहे..

गेल्या आठवड्यात आपल्या देशाच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांच्या पुढे गेला. त्याच कालावधीत अँपल कंपनीचे भांडवली बाजारातील मुल्य तब्बल ८०४ बिलियन डाँलर इतके प्रचंड वाढले.

अजून सोपे सांगायचं तर ५२,२६,००० कोटी रुपये इतकी झाली . आपल्या देशातल्या सर्व कंपन्यांचे बाजारमुल्य आहे ५२,१५,००० कोटी.

अजून सोपं …….

अँपलकडे आजमितीला रोख रक्कम आहे १५,६०,००० कोटी रुपये आणि आपल्या देशातल्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचं (रिलायन्स , टिसीएस आणि एचडिएफसी बँक ) एकत्रित मूल्य आहे १३,००,००० कोटी रुपये . म्हणजे अँपलने या तीनही कंपन्या विकत घ्यायचे ठरवले तरी २ लाख कोटी शिल्लक राहतील …..

हे तर काहीच नाही अँपलचे मुल्य ब्राझील, सिंगापूर ,मलेशिया वगैरे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्यापेक्षाही अधिक आहे.

वरच्या संख्यापुराणाचा सारांश खूप खूप महत्त्वाचा आहे……….

आज जगातल्या पहिल्या पाच कंपन्या आहेत अँपल , अँमेझाँन, अल्फाबेट म्हणजे गुगल, मायक्रोसाँफ्ट आणि फेसबुक.

या सर्व कंपन्यावर नजर टाकताच लक्षात येईल की,

१) या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत.
२) या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत.
३) या पाचही कंपन्या म्हणजे एक कल्पना होती.
४) या पाचही कंपन्या एकाच देशात जन्मलेल्या आहेत. तो म्हणजे अमेरिका . त्यातही ही सर्व मूळ अमेरिकनच्या पोटी जन्माला आलेली नाहीत तर ती निर्वासीतांची मुलं आहेत.
५) आतातरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे . ज्ञानाला मर्यादा असतात पण कल्पनाशक्तीला नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग ? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी एकवेळ चालेल पण कल्पनाशक्ती हवीच हवी.

“कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा” .

हे लिहू नका, ते वाचु नका, हेच खा, हे खाऊ नका….. अशा निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..