नवीन लेखन...

पारंपारिक उद्योगाची कल्पक भरारी

माणसाकडे कोणतेही कार्य करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर असाधारण आणि कठीण काम सुध्दा सोप्पी वाटू लागतात. पण हा अनुभव तेव्हाच मिळतो ज्यावेळी ते काम पूर्णत्वास येते आणि त्यावेळी मिळालेल्या यशापुढे आकाश सुध्दा ठेंगणे वाटू लागते. खादी उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या उद्योगात सुरुवातीलाच भव्य यश मिळून देण्याची किमया वर्धा जिल्ह्यातील बळवंत ढगे या तरुणाने साधली आहे.व्यवसाय हा मराठी माणसाचा पिंड नाही हा समज खोटा ठरवत केवळ दृढनिश्चयाचा बळावर हे यश त्यांने मिळवून दाखवले आहे. बळवंत स्वत: वर्धा जिल्ह्यातील “टाइम्स ऑफ इंडिया” ब्युरो मध्ये कुशल पत्रकार म्हणून देखील कार्यरत असून या क्षेत्रात सुध्दा त्याने लौकिक मिळवले आहे. उद्योग-व्यवसायाची प्रेरणा व त्यामध्ये यशस्वी होण्याचे श्रेय त्याने आपल्या वडिलांना दिले आहे; याचे कारण म्हणजे बळवंतने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचा मार्ग निवडावा ही त्यांचीच इच्छा होती, जेणे करुन स्वत:सह अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

२०११ रोजी खादी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या बळवंत ढगेच्या खादी व्यवसायाने अल्पावधीतच गारमेंट उद्योगातील व्यवसायिकांना दखल घेण्यास भाग पाडले ते म्हणजे त्याने खादीला दिलेल्या ट्रेंडी लूक मुळेच ! सामान्य भारतीय तसंच तरुणांच्या आयुष्यातून जवळपास हद्दपार झालेल्या खादीला बळवंतनी फॅशनेबल बनवून पुन्हा या कापडाकडे आकृष्ट करण्यात यश मिळवले. आज त्याचे काम अनेक तरुणांना मार्गदर्शक ठरत असुन, अनेकांनी या कामातून उद्योग करण्याची प्रेरणा घेतली आहे. काय आहे नेमका खादीला फॅशनेबल बनवण्याची बळवंत ढगेची क्लुप्ती ? आपण जाणून घेणार आहोत बळवंत ढगे यांनी मराठीसृष्टी.कॉमला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून.

बळवंत ढगे यांची मुलाखत ऐकण्यासाठी या चिन्हावर क्लिक करा.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..