नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, […]

मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मा.दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचार्याचला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत. काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या […]

एन. दत्ता

एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. हिंदी सिनेमात एन. दत्ता हे नाव प्रथितयश संगीतकारांच्या श्रेणीत आदराने घेतलं जावं अशी नेत्रदीपक सांगीतिक कामगिरी […]

खानदानी कविराज मंगेश पाडगावकर

खानदानी कविराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि […]

सागर आर्टस संस्थापक रामानंद सागर

रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद […]

बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘…बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ मा.राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या […]

बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारे सलमान खान

सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. सलमान खानचा जन्म२७ डिसेंबर १९६५ रोजी झाला.सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट ‘मैंने प्यार किया’ सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या […]

सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी

अमीन सायानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ‘बहनों और भाइयो’ गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत. एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध […]

शरद पवारांनी सांगितलेला किस्सा.

शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा. १९६८ साली मा.पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, मा.गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, […]

‘जनकवी’ पी. सावळाराम

पी. सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.पी.सावळाराम यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य […]

1 355 356 357 358 359 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..