नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन

गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! त्यांचा जन्म २१ सप्टेबर १९२३ रोजी झाला. हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल. जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले मा.गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या […]

मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज

स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा यांचा […]

श्री. तात्या अभ्यंकर यांनी लिहिलेला गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील लेख

दामू-गोविंदा जोड रे… राम राम मंडळी, १९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते. मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला […]

गीत एक – आठवणी अनेक : “आएगा आनेवाला”

संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus “आएगा आनेवाला” *1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी “महल” चित्रपट लिहीला. * त्यातलं “आएगा आनेवाला” हे […]

प्रख्यात बासरीवादक पंडित देवेंद्र मुर्डेश्वर

१९४० साली कर्नाटकातून देवेंद्र मुर्डेश्वर हे तबला शिकण्यासाठी मुंबईत आले. पण त्यांचे प्रेम बासरी वर होते. त्या मुळे त्यांनी बासरी शिकण्यास सुरवात केली. मा.पन्नालाल घोष हे त्यांचे गुरु, पन्नालाल घोष यांच्या मुलीशी देवेन्द्र मुर्डेश्वर यांचा विवाह झाला होता. पन्नालाल घोष यांच्या निधनानंतर मा.देवेंद्र मुर्डेश्वर यांनी मा. पन्नालाल यांचे बासरी वादन पुढे नेले.पन्नासच्या दशकात पं. रवी शंकर […]

गायिका सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांचा २८ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. सुमन हेमाडी हे नाव लग्नाआधीचे. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे […]

सुधीर गाडगीळ यांचा गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील लेख

सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका […]

मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, सुरेश खरे

सुरेश खरे हे महाराष्ट्राला नाटककार म्हणून परिचित असले तरी ते एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट लेखक, समीक्षक, संवादक, सूत्रसंचालक, संस्थाचालक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. परफॉर्मिग आर्ट्सशी संबंधित जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी हाताळले आहेत. सुरेश खरे यांचा जन्म  २५ जानेवारी १९३८ रोजी झाला. १९६० साली सुरेश खरे यांनी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या […]

हळुवार मनाचा कलंदर माणूस

संगीतकार सी. रामचंद्र अर्थात ‘अण्णा’ यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच ! “पतंगा” या चित्रपटाची गाणी तयार होत असताना ‘राजेंद्रकृष्ण’ यांनी एक ओळ लिहीली, ‘ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है’ ! खरं म्हणजे […]

ज्येष्ठ संगीतकार शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर

दादा चांदेकर या नावाने प्रसिद्ध असलेले मराठी संगीत दिग्दर्शक. त्यांचा जन्म १९ मार्च १८९७ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत […]

1 339 340 341 342 343 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..