अमिताभचा १९७७ सालचा अमर अकबर अँथोनी हा अतिशय गाजलेला चित्रपट कोणाला माहित नाही असे होणे नाही. आजही या चित्रपटातील गाणी आणि संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटात अमिताभने साकारलेले अँथोनी नावाचे पात्र फारच गाजले. लोकांच्या मनावर या पात्राने त्या काळी अधिराज्य गाजवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रपटातील अमिताभच्या पात्राचे वर्ण करणारे ‘माय नेम इज़ […]
उपेंद्र चिंचोरे यांनी ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे यांची सांगितलेली आठवण. ‘सुगंध त्याचा लपेल कां “? … ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे ह्यांच्या सहवासातील सुगंधित आठवणी :आज १९ एप्रिल त्यांची जयंती माझ्या लहानपणी रेडिओ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते ! त्याकाळी आम्ही रहात असलेल्या वाड्यामध्ये सर्वात आधी म्हणजे आमच्या घरी मर्फी कंपनीचा रेडिओ आला. […]
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा […]
पूनम ढिल्लन १९७७ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९६२ रोजी झाला. असे म्हटले जाते, की एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना ‘त्रिशुल’ सिनेमाची ऑफर दिली होती. सुरुवातीला पूनम यांची ऑफर नाकारली होती, मात्र नंतर त्यांनी तो सिनेमा स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे आयुष्यच पालटून […]
ललिता पवार यांचं माहेरचं नाव अंबिका लक्ष्मण सगुण व शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झालं होतं. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी झाला.१९२८ साली “आर्यमहिला ” या मूकपटात सर्वप्रथम भूमिका साकारली व त्यानंतर “गनिमी कावा” ,”राजपुत्र” , “समशेर बहादूर” , “चतुर सुंदरी”, “पृथ्वीराज संयोगिता”, “दिलेर जिग़र” यासारख्या मुकपटातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या “हिम्मतो मर्दा” या बोलपटात त्या नायिका […]
मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला. लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालती पांडे यांनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. […]
भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांगाची परंपरा. पंचांग म्हटले, की पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते दाते पंचांगाचे. १९०६ मध्ये लोकमान्य टिळकांनी ज्योतिष परिषदेत ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते. त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक […]
मराठी भाषेतील ज्येष्ठ विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा ऊर्फ वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६ रोजी झाला. वि. आ. बुवा यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ १९५० मध्ये केला. मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. तंत्र महाविद्यालयात बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे […]
हॉलीवूडची सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचे मूळ नाव ग्रेटा लूव्हिसा गस्टाव्हसॉन. ग्रेटा गार्बो यांचा जन्म १८ सप्टेंबर १९०५ रोजी स्वीडन मधील स्टॉकहोम येथे झाला. ग्रेटा गार्बो या वयाच्या चौदाव्या वर्षी पदवीधर झाल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या गरिबीमुळे त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागली. पुढे एरिक पेटशलर या दिग्दर्शक-अभिनेत्याशी तिची योगायोगाने गाठ पडली. त्याच्या प्रयत्नामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश […]
सुप्रसिद्ध सारंगीवादक आणि गीतकार उस्ताद सुलतान खान यांचा जन्म १५ एप्रिल १९४० रोजी झाला. राजस्थानमधील सिकार जिल्हात जन्मलेल्या उस्ताद सुलतान खान यांनी वयाच्या ११व्या वर्षी ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा आपल्या कलेची झलक दाखवली होती. तेव्हापासूनच त्यांनी आपले जीवन सारंगीवादनाला अर्पण केले होते. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पंडित रवी शंकर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमही केले. संगीत नाट्य अकादमी पारितोषिक, राष्ट्रपती पारितोषिक, महाराष्ट्र […]