या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील ! आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे . आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा . […]
नृत्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचे उत्तेजन मिळाले, मेडिकलच्या अभ्यासक्रमास जाता येईल इतके मार्क पडूनही केवळ नृत्यातच करिअर करायचे, या दृढनिश्चेयाने त्या या क्षेत्राकडे वळल्या. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९४८ रोजी मुंबई येथे झाला. सुचेता भिडे यांचे शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरात झाले. आचार्य पार्वतीकुमार आणि तंजावरचे गुरू के. पी. किटप्पा यांच्याकडे त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. कला अधिक चांगली शिकता यावी म्हणून […]
चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर […]
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील […]
बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या. बीना रॉय व […]
सबनीस कुटुंब मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या […]
या वर्षीच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या प्रतिष्ठीत दिवाळी अंकात कणकवलीचे विद्यमान आमदार श्री. नितेश राणे यांच्यावर सप्टेंबर २०१७ महिन्याच्या मध्यावर लिहिलेला माझा हा लेख. मी श्री नितेश राणेचा किंवा काॅंग्रेसचा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही. मी राजकारणावर लिहायचंही टाळतो. सिंधुदुर्गातील माझ्या परिचयाच्या आणि तौलनिक विचार करणाऱ्या काही जाणकारांशी चर्चा करुन मी श्री नितेश राणेवरील हा लेख लिहिलेला आहे. […]
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी बगदादमध्ये झाला. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक […]
तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव. मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना ‘अम्मो’ या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची […]
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या […]