नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार […]

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला “अपयशी” संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला. […]

वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव. मदनमोहन यांच्या […]

दिगंबर

कांदेपोहे हा त्याचा वीक पॉईंट आहे. ऐन जेवणावेळी येऊन पक्वान्नांऐवजी हिला पोहे करून मागणारा आणि पोट भरल्यावर “मजा आली यार…” म्हणून तृप्त भावाने निघणारा हा माणूस कुणाच्याही समजण्यापलीकडचा आहे! […]

सलिल चौधरी – प्रयोगशील संगीतकार!!

चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील. चित्रपटातील कविता अति गूढ […]

वसंत देसाई

हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करताना, बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरते किंवा हिंदी भाषिक गीतांपुरते आपले अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसे बंगाली, मराठी, पंजाबी दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करीत होते) यांनी आपली  कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात हे त्यांची मर्यादा असे म्हणता येणार नाही पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपले […]

काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत. […]

सज्जाद हुसेन

सुगम संगीत काय किंवा चित्रपट संगीत काय, इथे सर्जनशीलता जरुरीची नसते, असे म्हणणारे बरेच “महाभाग” भेटतात!! वास्तविक, सामान्य रसिक (हा शब्दच चुकीचा आहे ,जर रसिक असेल तर सामान्य कसा?) ज्या संगीताशी मनापासून गुंतलेले असतात, ते संगीत सामान्य कसे काय ठरू शकते? त्यातून, स्वरांच्या अलौकिक दुनियेत जरी शब्द “परका” असला तरी ते “कैवल्यात्मक” संगीत जरा बाजूला ठेवले […]

हेमंत कुमार

अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत. ते आधुनिक बंगाली गीते, बंगाली चित्रपटसंगीत, हिंदी चित्रपटसंगीत स्वतः: गात व त्यांची स्वररचना देखील करीत असत. याशिवाय आपल्या […]

सुधीर फडके – ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे

शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव. १९४१ मध्ये HMV सारख्या मान्यवर कंपनीत कारकिर्दीला सुरवात झाली, पुढे १९४५ मध्ये “प्रभात” कंपनीत शिरकाव करून घेतला आणि कारकिर्दीला  नवीन वळण मिळाले. सुधीर फडक्यांची खरी कारकीर्द गाजली ती […]

1 228 229 230 231 232 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..