नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक

मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा जन्म २८ जुलै रोजी झाला. शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात […]

हास्यकवी अशोक नायगावकर

हास्यकवी अशोक नायगावकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. मोठाल्या मिशांचे कवी अशोक नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप […]

बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्‌विंकल खन्ना

बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्‌विंकल खन्नाचा जन्म २९ डिसेंबर १९७४ रोजी पुणे येथे झाला. राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्नाची जन्मतारीख एकच २९ डिसेंबर. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्‌विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा […]

बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘…बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या […]

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९००रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर […]

अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग

अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ […]

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर

ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ रोजी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे झाला. आशालता करलगीकर यांची कारकिर्द हैदराबाद शहरात बहरली. वडील वकिली व्यवसायानिमित्त हैदराबादेत स्थायिक झाले होते. संगीत महामहोपाध्याय पंडित स. भ. देशपांडे, डॉ. एन. के. कऱ्हाडे, पंडित व्ही. आर. आठवले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. देशभरात शास्त्रीय गायनाचे त्यांनी दोन हजार कार्यक्रम केले. […]

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांचा जन्म २९ डिसेंबर १९४९ रोजी झाला. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना त्यांना हेल्मेट वापरण्याची कधी गरजच भासली नाही. किरमाणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे. फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६ […]

रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश

रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचा जन्म २९ डिसेंबर १७६६ रोजी स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅकिन्टॉश हे केमिस्ट होते. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. कामावरून घरी आल्यानंतर ते रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटचा शोध लावण्यास सुरुवात केली. वेगवेगळे […]

डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा

कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, विचारक, प्राध्यापक,म्हैसूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी झाला. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात त्यांचा […]

1 203 204 205 206 207 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..