मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..! […]
लहान मुलांमध्ये जन्मतः असलेल्या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्फ्रेड ब्लॅलॉक विसाव्या शतकातील अग्रगण्य शल्यविशारद होते. शल्यचिकित्सेतील भरीव कामगिरीसाठी कित्येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. १९५० सालापर्यंत ब्लॅलॉकनी जन्मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्या एक हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. […]
अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. […]
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मा.मोहन गोखले वावरले. […]
‘श्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत प्रा. श्री. के. क्षीरसागर हे शायरीचे अभ्यासक होते. टीकाकार म्हणूनही ते परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते. […]
रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. […]
सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. […]
क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. […]
सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ […]
इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला. इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे […]