वैचारिक लेखन
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
वाहन उद्योगाला मंदी आली ???
ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत […]
निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय. […]
काळाची चाहूल ?
नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]
बंध : निशब्द भावना
‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो. […]
ज्ञानार्जन – शिक्षण म्हणजे जाणिवेची प्रक्रिया
शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याबद्दल नाहीये .. खरं पाहता ते माणसाची जाणीव आणि आकलनशक्ती विकसित करण्याबद्दल आहे ..!! […]
प्रेमगंध..
“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..? […]
