वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.

वेदांतील सर्वांत जुना आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद. एखादी गोष्ट ऋग्वेदाच्या बाबतीत खरी असेल तर ती इतर ३ वेदांच्या बाबतीतही खरी असते. आणि ऋग्वेदाबाबतीत एखादी गोष्ट खरी नसेल तर ती इतर ३ वेदांनीही स्वीकारलेली नसते हे आपणास माहिती आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जर ऋग्वेदात ब्राह्मणवाड नसेल तर इतर ३ वेदांतही तो नाही हे मानण्यास प्रत्यवाय नाही. असा विचार करून मनात काहीही पूर्वकल्पना न ठेवता जेव्हा मी ऋग्वेद संहिता तपासू लागलो तेव्हा संशोधनांती हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तेच आत्ता तुमच्यासमोर मांडतोय.

ऋग्वेदाच्या १० मंडलांत मिळून एकूण १०२८ सूक्ते आहेत. हि सारी सूक्ते एकूण ३९० ऋषींनी लिहिलीयत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मला सापडलेल्या माहितीनुसार, या मंत्रद्रष्ट्या ऋषीपैकी २१ स्त्रिया स्त्रिया आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सार्या ऋषीपैकी ४७ ऋषी अब्राह्मण आहेत! या अब्राह्मण ऋषींची नावे आणि त्यांनी रचलेल्या सूक्तांची (ऋचांची नव्हे!) संख्या येथे देत आहे.
मधुछंद विश्वामित्र (११)
जेता मधुछंदस (१)
अंबरिष (१)
वर्षागीर (१)
इंद्र (३)
मरुत (१)
विश्वामित्र गाथिन (४९)
ऋषभ वैश्वामित्र (३)
कत वैश्वामित्र (२)
प्रजापति वैश्वामित्र (५)
भारताश्वमेध राजा (१)
संवरण प्राजापत्य (२)
कुमार आग्नेय (२)
वैवस्वत (५)
ययाती (१)
नहुष (१)
साम्वरण (१)
वैश्वामित्र वाच्य (२)
रुणन्चय राजर्षी (१)
सिंधुद्विप आंबरिष (१)
यमी (२)
विवस्वान (१)
यम (२)
शंख यामायन (१)
दमन यामायन (१)
देवश्रवा यामायन (१)
सुंशुक यामायन (१)
मथित यामायन (१)
विमद ऐन्द्र अथवा प्राजापती (७)
वसुक्र ऐन्द्र (३)
इंद्रस्नुषा (१)
अभिताप सौर्य (१)
मुष्कवान ऐन्द्र (१)
वैकुंठ ऐंद्र (३)
नाभानेदिष्ट मानव (२)
सर्प ऐरावत जरत्कर्ण (१)
सावित्री सूर्या (१)
इंद्राणी (३)
वृषाकपि ऐन्द्र (१)
रेणू वैश्वामित्र (१)
शार्यत मानव (१)
अर्बुद सर्प (१)
उर्वशी (1)
सर्वाहारी ऐन्द्र (१)
अप्रतिरथ ऐन्द्र (१)
अष्टक वैश्वामित्र (१)
पणय: असुर तथा देवशुनी सरमा (१)
लबरुपापन्न ऐन्द्र (१)
हिरण्यगर्भ प्राजापती (१)
अग्नी, वरूण, सोम (१)

यावरून असे दिसते कि सुमारे १३९ म्हणजे ऋचान्च्या एकूण संख्येच्या १०% हूनही अधिक ऋचा या अब्राह्मण मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लिहिल्या आहेत. वरील आकडेवारीबद्दल कुणाला शंका असल्यास आपण स्वत: ऋग्वेद संहिता पाहून खात्री करू शकता.

यावरून कुणीही सूज्ञ व्यक्ती हाच निष्कर्ष काढेल कि वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता. कुणीही व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) त्याच्या गुण आणि कर्मांनी योग्य तो वर्ण प्राप्त करून घेऊ शकत असे. जातीव्यवस्था ही कधीही भारतीय समाजाचा भाग नव्हती, हिंदू धर्माचा तर नव्हतीच. जातीव्यवस्था ही अहिन्दुंच्या आक्रमणामूळे झालेले जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांपैकी एक आहे – आणि आजचे राजकारणी व अन्य भारतद्वेषी लोक तिला खतपाणी घालत आहेत आणि ते ही “ब्राह्मणवाद” नामक एका निरर्थक आणि पोकळ शब्दाचा आश्रय घेऊन! अश्यांना किती थारा द्यायचा हे आपणच ठरवा. आपण सूज्ञ आहात.

जयतु भारतं ||

© विक्रम श्रीराम एडके.
संपर्क : edkevikram@gmail.com
www.vikramedke.comBe the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…