नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]

स्त्री- मुक्ती…

आता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे ? डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ? ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ! जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय! ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल … […]

शब्द, अक्षर, भाषा : पुन्हां चारोळी, मुक्तक

कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें  हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ;  पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

निष्कर्ष आणि समारोप : मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक  (a must) वाटत नाहींत […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग – १० / ११

जीवन , प्रेम , आनंद , वगैरे  ;  आणि मरणोच्चार  : मरणाचा विचार-उच्चार can be with reference to a number of things, मग तें जीवन असो, प्रेम असो, राष्ट्रभक्ती असो,  वा अन्य कांहीं असो. आपण कांहीं उदाहरणें बघूं या. Life hurts a lot More than Death. – Death is not the greatest loss in life ! […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ९ / ११

गीत  :  ( भावगीत, सिनेगीत, ग़ैरफ़िल्ली गीत, लोकधारा, पोवाडे, आरत्या, उखाणे इ. ) – गीत हें खरें तर पद्यच आहे. लयबद्ध काव्य चालीवर गाइलें की त्याचें गीत होतें, तें भावगीत असो, सिनेगीत असो, लोकधारेमधील गीत असो वा अन्य कसलेंही असो. भावकविता आणि भावगीत हे किती एकरूप आहेत हें आपल्याला माहीतच आहे. ( भावकविता आधी आली, म्हणजे […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ड /११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] कविवर्य  ग्रेसांचें कांहीं काव्य  पहा – डोंगरापुढे कल्लोळ, अलिकडलें सर्व निवांत निजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत । – खोल उठे काळाचा गहिवर जळे सतीची चिता एक विराणी घेउन, मृत्यू सदैव फिरतो रिता. – चुकून संध्याकाळी जिवलगाच्या मृत्यूची बातमी आली तर कुणालाही सांगूं नये. – ‘अंगसंग’ याला ग्रेस  […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-क / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] मृत्यूचा उल्लेख असलेली , काव्याची आणखी कांहीं उदाहरणें  पहा – आतां जायाचंच की कवातरी पट्.दिशी वसंत बापट – मरणाच्या मुहूर्तावर ओठीं गाणं ओथंबून यावं. सदानंद रेगे – कोणत्याही क्षणीं आम्ही जीवनाच्या प्रवाहातून मरणाच्या कुरळ्या लाटा कधीच वेगळ्या केल्या नाहींत करूं शकलो नाहीं , करूं इच्छीत नव्हतो आणि हेंही आमच्या […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ब / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] ऐतिहासिक कवितांमध्ये तर अनेकदा मरणाचे उल्लेख असतातच  – शिवरायाचा सिंह सिहगडिं पडला समरांगणीं मराठा गडी यशाचा धनी   ।। –     कुंजविहारी – खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राईराईएवढ्या  ।। – स्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही  मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे […]

1 99 100 101 102 103 140
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..