चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले. […]
बॉब वूल्मर हे फर्स्ट क्लास क्रिकेट खूप खेळले होते.
बॉब वूल्मर पहिला कसोटी सामना ३१ जुलै १९७५ रोजी इंग्लंविरुद्ध खेळले तेव्हा ते २७ वर्षाचे होते. आपल्या मध्यम द्रुतगतीने त्यांनी एम.सी.सी कडून खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट-ट्रिक केली होती . परंतु पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्य्यांना ड्रॉप करण्यात आले आणि त्यांना त्या सीरिजच्या शेवटच्या सामन्यात खेळवण्यात आले तो सामना ओव्हलवर होता . या सामन्यामध्ये ५ व्या क्रमांकावर खेळताना १४९ धावा काढल्या. […]
१९५९-६० साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी वेस हॉल आणि चार्ली ग्रिफिथ यांच्या गोलंदाजीवर त्यांनी अत्यंत प्रभावी फटके मारून नाबाद १३२ धावा पहिल्या कसोटी सामन्यामध्ये केल्या. तर त्यांनी चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ११० धावा केल्या. त्यांनी त्या टूरमध्ये ६५.७५ च्या सरासरीने ५२६ धावा केल्या. त्यावेळी १९६१ मध्ये त्यांचे नाव ‘ विझडेन ऑफ द इयर ‘ मध्ये नोंदले गेले. […]
१९१० ते १९१४ पर्यंत ते केंटकडून खेळत होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे ७ वर्षे फुकट गेली. टिच फ्रीमॅन यांनी १९१९ च्या लहान सीझनमध्ये ६० विकेट्स घेतल्या तर १९२० मध्ये १०२ विकेट्स घेतल्या तर १९२१ मध्ये १६६ विकेट्स घेतल्या आणि १९२२ मध्ये १९४ विकेट्स घेतल्या ही त्यांची जबरदस्त गोलंदाजी पाहून , परफॉर्मन्स पाहून विझडेनने १९२३ मध्ये त्यांना ‘ विझडेन क्रिकेटियर ऑफ द इअर ‘ म्हणून त्यांना सन्मानित केले. […]
भारतीयांना एक सुखद आठवण नेहमीच आठवते ती म्हणजे संदीप पाटील यांनी बॉब विलिसला जे सहा चौकार मारून २४ धावा एका षटकामध्ये केल्या. आजही ते सहा चौकार बघताना बॉब विलिसचा बदललेला चेहरा समोर येतो. […]
७ जून १९७५ रोजी पहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला. ७ जून ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्यावहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता. […]
स्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे. […]
अँजेलो मॅथ्यूजचा फलंदाज म्हणून ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला. […]
रुसी फ्रेमरोज सुर्ती हे भारताकडून क्रिकेट खेळलेच त्याचप्रमाणे गुजराथ, राजस्थान आणि क्वीन्सलँडकडूनही क्रिकेट खेळले. ते ऑल-राउंडर होते. रुसी सुर्ती गोलंदाजी करताना चेंडू डाव्या हाताने सिम आणि स्विंग करत असत तर प्रसंगी स्पिन देखील करत असत. ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते , एकनाथ सोलकरप्रमाणे. ते स्वतः सर गॅरी सोबर्स ला आदर्श मानत असत. त्यांचा खेळ पाहून त्यांना ‘ गरिबांचा गॅरी सोबर्स ‘ देखील म्हणत. […]
जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले. […]