नवीन लेखन...

जागतिक रसायन शास्त्रज्ञ

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्‍या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. जागतिक रसायनशास्त्रज्ञ  लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 176 किंमत : 180 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
[…]

हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?

आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्‍या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130 […]

देवस्वरूपा कामधेनु: वैज्ञानिक महत्त्व

आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी त्यांचे संकलन संपादन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे. देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार पाने : १४०, किंमत : १२५ रू.
[…]

निवडक बॅंकिंग निवाडे

`शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्‌ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत. बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते.
[…]

निसर्गाची नवलाई

निसर्गाची नवलाई अनेक अंगाने मनुष्याला खुणावत असते. भूकंप, ज्वालामुखी, आदी या नवलाईची काही रूपे रहस्यमयी, विस्मयकारी आहेत तर धबधबे, सरोवर, गरम पाण्याचे झरे ही रूपे मनोहारी, आल्हाददायी आहेत. अशा विविध 25 नवलाईंमागील रहस्य, विज्ञान, कारणमीमांसा यांचा उलगडा अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई मध्ये केला आहे. कोणत्याही वयोगटाच्या वाचकांना हे लिखाण आवडावे व त्यांच्या ज्ञानात भर पडावी. लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 पाने: ९२,किंमत : रू ९०/-
[…]

“प्रदूषणातून पर्यावरणाकडे”

“प्रदूषणातून पर्यावरणाकडे” या शीर्षकामागे कोणते विज्ञान दडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या हातात हे पुस्तक आल्या आल्या निर्माण झाली. लेखकाचे मनोगत वाचताच या पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे विचार अधिक सक्रीय व तीव्र होतील याची खात्री पटली. स्वानंद सोनी पर्यावरण कार्यकर्ता 9960298639 प्रदुषणातून पर्यावरणाकडे डॉ. किशोर पवार/सौ. नलिनी पवार पाने : 160, किंमत : 160 रू. नचिकेत प्रकाशन
[…]

पतसंस्थांसाठी सहकारी परिपत्रके

सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्‍या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. संपादक – नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015 ( : 0712-2285473, भ्र. 9225210130) पाने : ११० किंमत : 350 रु.
[…]

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने….

पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती […]

गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. […]

1 13 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..