नवीन लेखन...

अपूर्ण प्रेम

प्रेमाचे पूर्णत्व कोणाकडेच नसते प्रेम जन्मालाच अपूर्ण येते… अर्धे प्रेम त्याच्याकडे अर्धे प्रेम तिच्याकडे फक्त त्या दोघांचेच प्रेम एकत्र येता प्रेम पूर्ण होते… प्रेमाच्या पूर्णत्वालाही आयुष्याची मर्यादा असते अपूर्ण प्रेम शेवटी अपूर्णच असते… ©निलेश बामणे

प्रेम…

प्रेम एक स्त्री एक पुरुष यांचे मिलन नसते… प्रेम समुद्र आहे अमर्याद खोल अथांग… प्रेम पाण्यात साखर विरघळते तसे विरघळणे असते अस्तित्वात नसतानाही आपला गोडवा राखणारे… प्रेम मेणबत्ती सारखे जळणे असते जगाला प्रकाश देत… प्रेम फक्त मरणे असते जगणे त्यास माहीतच नसते प्रेम एक भ्रम असते जे साऱ्या जगाला भ्रमित करते… ©निलेश बामणे

मंद गारवा हवेत…

हृदयात वणवा होता नजरेत ती होती मंद गारवा हवेत मनात उब होती डोक्यात विचार होता ओठावर कविता होती मंद गारवा हवेत शब्दात उब होती भोवती प्रेम होते सुंदर ती होती मंद गारवा हवेत तिच्यात उब होती जगणे सुरू होते जीवनात मजा होती मंद गारवा हवेत जगण्यात उब होती जवळ ती नाही फक्त कल्पनेत होती मंद गारवा […]

कविता…

कवितेच्या मागे धावता – धावता मी कधी म्हातारा झालो ? मला कळलेच नाही… माझे तारुण्य चोरून रोज अधिक तरुण होणारी माझी कविता कधी म्हातारी झालीच नाही… माझी कविता आता रोज तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय क्षणभरही शांत बसत नाही… तिच्या प्रेमात पडलेले माझे म्हातारे हृदय आता फडफडल्या शिवाय रहात नाही… आता मला तिच्यावर कोणतीच बंधने घालता येत नाही […]

मिलन…

चंद्र तू पौर्णिमेचा काळोख मी आमवस्येचा … तुझे सौंदर्य कलेकलेने वाढत जाते पौर्णिमेला ते पूर्ण होते… माझ्या हृदया व्यापून टाकते आणि पुन्हा कलेकलेने कमी होते… आमवस्येला सौंदर्य तुझे शेवटी कुरूप होते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले मिलन होते… ©कवी – निलेश बामणे

हळुवार तू …

हळुवार तू…हळुवार तू … सारेच तुझे हळुवार…हळुवार तू …।।धृ।। हळुवार लाजणे, हळुवार रुसणे, हळुवार हसणे, हळुवार बोलणे ।। १ ।। तुझे हळुवार माझ्या प्रेमात पडणे, तुझे हळुवार मला प्रेमात पाडणे । ।२।। तुझे हळुवार प्रेम हळूच व्यक्त करणे तुझे हळुवार माझ्या हृदयात शिरणे ।।३।। तुझे हळुवार मला हळूच स्पर्शने गालात तुझ्या हळुवार गोड हसणे ।।४ ।। […]

आपली पिल्ले

आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना – (भाग – 1) अरे राजा ये ना नको ग आई नोकरी मला लागू दे डॅालर जरा कमवू दे कर्ज माझे फिटू दे मग मी येईन अरे राजा ये ना नको ग आई गर्दी किती तिथे राहू मी कुठे? घर मला घेऊ दे मग […]

फक्त हिमतीने लढ

ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो.. घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ? हात नाहीत सुगरणी […]

ज्येष्ठ IS THE BEST

आम्ही ना म्हातारे, आम्ही आहोत ‘ज्येष्ठ’ उचलू आम्ही जबाबदारी, आम्ही नाही ‘वेस्ट’ फक्त थोडी लागे आता, मधून आम्हां ‘रेस्ट’ कारण दुखतात आता, हात पाय कधीतरी ‘चेस्ट’ खाण्याचेही शौकिन आम्ही, घेतो सगळ्यांची ‘टेस्ट’ त्यामुळेच घ्याव्या लागतात पँथॉलॉजीच्या ‘टेस्ट’ जीवनातील गोष्टींचीही माहिती आम्हां ‘लेटेस्ट’ तरीही माहीत नाही, उरले आयुष्य किती ‘रेस्ट’ वाट पाहतो त्याची कारण, केव्हांतरी सांगेल तो, […]

प्रेमवेडा …

जर मी तुझ्या प्रेमात पडलो नसतो तर कोठे असलो असतो ? जगातील कोणत्यातरी पैशाच्या उकिरड्यावर गाढवासारखा लोळत असतो… एखाद्या बैलासारखा जगात कोणाच्यातरी सुखासाठी राबत असतो… मदमस्त हत्तीसारखा माझ्याच खोटया अहंकारात फिरत असतो… जगातील निरर्थक सुखे मिळविण्यासाठी निरर्थक भटकत असतो… भविष्याच्या उदरात मी इतक्या सहज शिरलो नसतो… माझ्या जन्माचं रहस्य मी जाणूच शकलो नसतो… जगातील सारी दुःखें […]

1 304 305 306 307 308 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..