नवीन लेखन...

परावलंबी

जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  […]

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।। चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।। संचित पुण्य आजवरचे,  कार्य सिद्धीला लागते  […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।। आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।। प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।। अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी, दिसत  नाही […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।। आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।। एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।। दुजामध्ये […]

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

1 286 287 288 289 290 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..