नवीन लेखन...

भरकटलेली संवेदनशीलता !

ज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.
[…]

सर्व काही केवळ प्रसिद्धीसाठी!

लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
[…]

संगनमताच्या राजकारणाने नासविली व्यवस्था!

सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्‍यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे  यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.
[…]

मारेकर्‍यांसाठी पायघड्या !

आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
[…]

उदंड जाहल्या सुट्ट्या !

सुट्ट्यांच्या बाबतीत जी जागरूकता, जो आग्रह सरकारी कर्मचारी दाखवितात तो आग्रह किंवा ती जागरूकता कामाच्या बाबतीतही दाखवायला पाहिजे. स्वत: सरकारी कर्मचाऱ्यांनीच पुढे होऊन, आम्हाला नकोत या सुट्ट्या असे सांगायला पाहिजे; परंतु सध्यातरी तसे होण्याची सुतराम शक्यता नाही. हे ज्या दिवशी घडेल तो दिवस निश्चितच भाग्याचा असेल आणि त्याच दिवसापासून आपला प्रवास खर्‍या अर्थाने महासत्तेच्या दिशेने सुरू झालेला असेल. […]

शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे. […]

नादानपणाची मर्यादा

नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत. […]

लाचार, मुर्दाड की दिशाहीन ?

जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!
[…]

काळवंडलेला राष्ट्राभिमान !

अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.
[…]

प्राधान्यक्रमाचे अवमूल्यन !

चर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.
[…]

1 5 6 7 8 9 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..