नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

ते हात … गोष्ट सुनामी प्रलयानंतरची

  मी कार्यालयामध्ये बसलो होतो. कामाचे नियोजन, झालेल्या कामाचा आढावा यावर चर्चा सुरू होती. इतक्यात, दूरध्वनी वाजला. वृत्तपत्राच्या कार्यालयात ही एक नित्याची बाब होती. दूरध्वनी उचलला. “आपण संपादक आहात का?” – प्रश्न आला. “हो.” मी उत्तर दिलं. “साहेब, एक विनंती करण्यासाठी दूरध्वनी केला होता. आजच्या अंकात तुम्ही तमिळनाडूतील विध्वंसाची जी छायाचित्रे प्रकाशित केली आहेत, ती धक्कादायक […]

कचकड्यांचे मोती

  सन्मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला, असं काहीसं सांगितलं जातं. त्यामुळंच कदाचित माणसं आपली झालेली फसगत सांगायला फारशी राजी होत नसावीत. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर किती गार वाटलं, याच्याच कथा अधिक. तर आज मी सांगणार आहे, ती घटना आहे माझ्या फसगतीची. अंध विश्वासाची आणि यशाकडे जाण्यासाठी शॉर्ट कट निवडण्याची. तो काळ होता 1998 चा. माझा […]

पाणी

माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात […]

नमस्कार

  नमस्कार करणं याला भारतीय संस्कृतीमध्ये प्रदीर्घ परंपरा आहे. नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तेवढेच अर्थही. लहानपणी वडिलांकडे सातत्यानं माणसांचा राबता असायचा. दृष्टिभेट होताच सहजपणे ओठावर यायचं रामराम. अभिवादनाचा आणखी एक आविष्कार. मी लहान होतो; पण वडिलांकडे येणारी मंडळी मलाही म्हणायची रामराम. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून रामराम म्हणायला हवं; पण त्याचा सराव नव्हता. अनेक वेळा त्यावरनं […]

अपघात

  अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, […]

चष्मा

  परवाच जागतिक महिलादिन साजरा झाला. विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. महिलांची प्रगती आणि समस्यांवर चर्चा झाली. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीनं आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमाला मी हजर होतो. आरोग्यविषयक प्रश्नांबाबतची जागरुकता, असा चर्चेचा विषय होता. भाषणं झाली. महिलांनी स्वतःची काळजी कशी अन् किती घ्यायला हवी, हे सांगण्यात आलं. त्या वेळी माझ्या मनात एक आठवण आली. तिथंही सांगितली, […]

दुःख? कोठे आहे?

  आपण आनंदाचा विचार करतो त्या वेळी खरे तर विचार दुःखाचा असतो. दुःख आहे म्हणूनच आनंदाचा शोध आहे. प्रश्न असा येतो की, माणूस दुःखी का होतो आणि माणूस आनंदी तरी का होतो? मध्यंतरी माणसाच्या आनंदाच्या, समाधानाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. माणसाकडे खूप पैसे असले की आनंदाची साधने त्याला खरेदी करता येतात, असा […]

सदिच्छा

सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो.
[…]

1 492 493 494 495 496 497
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..