स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत. दिवंगत राजीव […]
संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा […]
मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील एक प्रतिक्रिया श्री. किशोर मांदळे यांची आहे . ( टीप : मोरे यांच्या लेखातील मुद्द्यांचा व त्यावरच्या विविध प्रतिक्रियांमधील मुद्दयांचा परामर्श मी एका वेगळ्या दीर्घ लेखात केलेला आहे. ज्यांना […]
कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।’, किंवा ‘अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें […]
एप्रिल-मे हे सर्वांचे आवडते महिने! मुलांना शाळेला सुट्टी म्हणून-तर आई-बाबांना मुलांना सुट्टी म्हणून. खरंतर सगळेच रिलॅक्स! मौजमजा, सहली, मामाचागाव इत्यादीमध्ये सुट्टी कधी संपते ते कळतही नाही. मे संपून जून सुरू झाला की मंडळी भानावर येतात. चिमणीपाखरं आपापल्या घरट्याकडे परततात. नकळत शाळेची घंटा साद घालू लागते, मुलांना आणि पालकांनाही! हल्ली तर बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची शाळा ठरते. […]
सकाळी उठल्या उठल्या खिडकी उघडून बाहेर डोकावले. आज सूर्य देवाने पडद्याआड रहाणेच पसंत केले होते. काळ्याभोर घनमालांनी दिलासा दिला. ‘होय, तो आज नक्की येणार’. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ग्रीष्माच्या भट्टीत होरपळलेली सृष्टीही माझ्यासारखीच अधीर झाली होती. मृगाचे चार दिवस उलटून गेलेत, तरी याच्या येण्याची चाहूल नाही. फक्त जीव गुदमरून टाकणारे वातावरण स्वत:शीच स्पर्धा करीत […]
शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची […]
माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय ! माझी आजी म्हणजे माहेरची “द्वारका” ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, […]
एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत होतो. एखाद्या चलचिञपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून चिञे जावीत तशी काॅलेजच्या अाठवणी भुर्रकन निघून गेल्या अाणि अाठवले काॅलेजचे ते सोनेरी क्षण…………… जीवनरूपी काटेरी वळणावर मार्गक्रमण […]
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए.क.कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा ‘ए.क.कवडा’ नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर […]