चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. […]
गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]
गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या […]
नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट…! तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंद्रावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंद्राचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं… तर… …तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती. नील […]
काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा […]
रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. “दगडूदादा, एक पाव भाजी दे दे […]
जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात. रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे […]
मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान….. […]
दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता. […]
माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही. […]