या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो, ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात, जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही. जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो. […]
ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट. तसेच अन्नरस तयार झाला […]
पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात. ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि […]
पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते. पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना […]
एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही. पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, […]
पोट म्हणजे जणु काही मिक्सरच ! भांडे अर्धे अन्नाने, पाव भाग पाण्याने, असे एकुण पाऊण भरावे. पाव भाग हवेच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा. आणि झाकण लावावे आणि दीड दोन मिनीटात मिक्सरमध्ये सर्व अन्नाचे पीठ तयार होते, हे आपण बघतोच. जसं मिक्सरमध्ये तस्संच अगदी पोटामधे सुरू असतं ! फक्त पोटामधे हा मिक्सर दीड दोन मिनिटाऐवजी दीड दोन घंटे […]
ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम […]
आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये. लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, […]
अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो. लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली […]
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ. एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना […]