नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत. […]

डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे

उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो. […]

बैठे बैठे सावधान

शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया. […]

गणिताची भीती

गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा. […]

जटामांसी

जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात. जटामांसीचे गुणधर्म […]

अशोक

हा आंब्याच्या सारखा दिसणारा ८-१० मीटर उंच सदा हिरवा राहणारा वृक्ष आहे.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पाना सारखी दिसतात.फुले दाट व गुच्छात येतात.हि सुगंधी व आकर्षक पिवळट तांबड्य् रंगाची असतात.फळ ८-२५ सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असते शेंगा चपट्या असतात व त्यात ४-८ बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व फुले आहेत.हा चवीला […]

गंभारी/ काश्मरी

ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो,बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते.जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब,८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो.त्याच्या टोकाशी गाठी असतात.त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात.फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते.ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे […]

यष्टीमधू/ज्येष्ठमध

ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची […]

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. […]

मसाल्यांनी वाढवा सौंदर्य

आजकाल अनेकांना भारतीय मसाले आणि त्यांचे औषधी गुणधर्म याची महती पटू लागली आहे. चेहऱ्यावरची मुरुम त्वचेवरची बंद छिद्र यावर त्याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. याबद्दल काही खास टिप्स. दालचिनी : दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारत दालचिनीचा चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांवर चांगला उपयोग होऊं शकतो. याची पेस्ट तयार करून […]

1 46 47 48 49 50 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..