नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील बदल भाग ५० – चवदार आहार -भाग ११

आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ. सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात. आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात. गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील. भारतीय आहारात […]

आहारातील बदल भाग ४९ – चवदार आहार -भाग १०

मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते. एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण. गुण वाचताना वाटते… व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !! आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही. (मी […]

आहारातील बदल भाग ४८ – चवदार आहार -भाग ९

तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव. हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव. अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव ! कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, […]

आयुर्वेदिक (?) Detox water

आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी फ़ंडे खपवण्याचे एकेक नवीन पीक येत असते. खरीप असो व रब्बी; कोणत्याही हंगामात अशी पिकं उगवतात. अर्थात ही पिकं जास्त काळ टिकत नसली तरी आयुर्वेदाचे नाव पुढे करून लोकांचा बुद्धिभेद करण्यात मात्र बऱ्यापैकी यशस्वी होत असतात. अशापैकीच एक फॅड म्हणजे Detox water Detox water म्हणजे काय? काही भाज्या आणि फळांचे तुकडे करून ते […]

आहारातील बदल भाग ४७ – चवदार आहार -भाग ८

सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात. सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे. सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे. किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते. ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते. […]

आहारातील बदल भाग ४६-चवदार आहार -भाग ७

आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ? आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे. आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते. शिल्लक काय रहाते ? जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते. मागे […]

हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

मला अजूनही उमगले नाही,.. शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात… 1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240… 3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला. मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो…. एकूणच […]

आहारातील बदल भाग ४५ – चवदार आहार -भाग ६

लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात. मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे. मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते. कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ […]

आहारातील बदल भाग ४४ – चवदार आहार -भाग ५

जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव ! नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! […]

1 123 124 125 126 127 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..