पडवळ सांभार

दोडका, गोसाळे (गिलके), पडवळ या भाज्या ताटात दिसल्यानंतर कितीही भूक असली तरी पोटात जात नाहीत.
[…]

फ्रीजमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी काही टिप्स

पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. परंतु, याचा अर्थ तो तिथेच पडून द्यावा असा नाही. ‘स्मार्ट वूमन’ फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजेत, यासाठी या काही टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील…
[…]

उपवासाची खांडवी

श्रावण सुरू झाला की, उपवास सुरू होतात आणि उपवास सुरू झाले की, उपवासाचे विविध पदार्थ शोधले जातात. नेहमीच साबुदाणा खिचडी अथवा वरीचा भात खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी वेगळा, चटपटीत उपवासाच पदार्थ ताटात आल्यावर उपवासाचा देखील आनंद घेता येतो.
[…]

हरबर्‍याची भाजी आणि भाकरी

साऊथमधला इडली-डोसा महाराष्ट्रतल्या घराघरात कधी पोहोचला हे जसे कोणाला कळले नाही तसेच काहीसे हरबर्‍याच्या भाजीचे आहे. वाळलेले हरबरे तळून किंवा ओले हरबरे लिंबू पिळून, त्यावर थोडे मिठ, चाटमसाला टाकून आपण शहरी लोक खातोच ना. पण हे हरबरे शेतात डौलाने उभे असतात त्यावेळी ते पाहण्याची गंमत देखील औरच. हिरव्या रंगाचे टपोरे मोती कोणी एखाद्या छोट्याशा झाडाला लटकवून ठेवावेत आणि ते वार्‍याच्या झोताने डोलताना पहावयास मिळावेत.. अहाहा… अगदी म्हैसूर किंवा पैठणच्या उद्यानात आपल्या प्रेयसीचा दुपट्टा वार्‍यावर उडल्यासारखे वाटले ना.. असो.. […]

जळगावचं वांग्याचं भरीत

नोंव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात वांग्याच्या भरीताला चव असते. जून-जुलैत लागवड केलेली वांगी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी बाजारात येतात. माणसी १ किलो या प्रमाणे घरातील एकूण कुटुंबाला लागतील तितकी वांगी खरेदी केली जातात. त्यासोबत हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, लसूण, शेंगदाणे हे पदार्थ भरतासाठी लागतात. काड्यांवर किंवा काट्यांवर भाजलेले वांग्याचे भरीत अधिक चविष्ट असते. म्हणून खास भरीतासाठी तुर खाटी किंवा कपाशीच्या कांड्याचे ढीग करुन ठेवले जातात. […]

1 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..