ब्लड प्रेशर मॉनिटर
ॲनरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. […]
