नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

कारगिल युद्ध : कारगिल रिव्ह्यू कमिटी शिफारशीवर अंमलबजावणी जरुरी

२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे. […]

‘सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज

भारतातील डिजिटल उपभोक्ता वाढत असून, भारतीय ग्राहक विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर सक्रियपणे करत आहेत. मात्र, फसवणुकीचा धोकाही त्यामुळे वाढला असून, चारपैकी एक ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहे. एक्स्पिरिअनच्या डिजिटल कंझ्युमर इनसाइट्स १६ जुनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. […]

चीनचे आशियाई व आफ्रिकन देशांवर आर्थिक आक्रमण

अनेक देश चीनी गुंतवणूकीमुळे कर्ज बाजारी बनत आहेत. आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याकरता आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये चिनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. झिम्बाब्वे आज पुरता रसातळाला गेला आहे, तर पाकिस्तान,श्रीलंका दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे. कारण चीन अशा देशांना हवे तितके कर्ज देतो आणि मग देश कर्जामध्ये अडकतात. […]

महाराष्ट्रासमोर जलसुरक्षेचे बिकट आव्हान

महाराष्ट्रामध्ये सरासरी ५० इंच पाऊस पडतो आणि तरीही पाण्याची टंचाई भासते. कारण आपले पाण्याचे व्यवस्थापन चांगले नाही. उपलब्ध होणा-या पाण्यातून ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. शेतीला पाणी देण्याची प्रवाही पद्धत फार चुकीची आहे. ती बदलली आणि शेतातल्या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. २० टक्के पाण्यामध्ये ठिबक सिंचनाने तेवढेच क्षेत्र भिजू शकते आणि पाटबंधारे योजना तसेच विहिरी यातील पाणी यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकते. […]

ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव

…. त्यानंतर मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि माझा निष्कर्ष असा आहे ज्योतिष्य शास्त्र खरे आहे पण त्याचा आधार घेऊन भविष्य बदलता येत नाही. ज्योतिष्यशास्त्र सुद्धा तुमच्या घडणार असणाऱ्या भविष्यासाठी कारणीभूत असू शकते. […]

आओ खेले ‘मेंढीकोट’चा अर्थ

‘बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले ‘मेंढीकोट’..’ हे मुंबंईतील दादर, माटुंगा, वांद्रे परिसरातील रस्त्याकडेच्या भिंतींवर गेल्या वर्षभरात रंगाच्या स्प्रेने लिहिलेलं आढळून येणारं आणि कोणताही आगापिछा नसणारं, शहर वासीयांमधे संभ्रम निर्माण करणारं एक गुढ संदेशात्मक वाक्य..! मी पाच-सहा महिन्यांपूर्वी यावर एक आर्टीकलही लिहिलं होतं. […]

आव्हान समुद्र मार्गाने, भूमार्गाने बेकायदेशीर व्यापार रोखण्याचे

ग्राहकांमधील जागृतीचा अभाव हे बेकायदेशीर व्यापार फोफावण्यामागील प्रमुख कारण आहे. काही लोक बँडेड वस्तू परवडत नाही, म्हणून बनावट वस्तू खरेदी करतात. हे प्रकार रोखण्यासाठी आपल्याला पारदर्शक व्यवस्थेची गरज आहे. नागरिकांनी बेकायदेशीर वस्तू चांगली आणि स्वस्त असली तरीही घेऊ नये. आपण अशा वस्तू घेताना जीएसटी क्रमांक असलेले बिल मागणे आवश्यक आहे. कारण यावर जीएसटी दिला जात असेल तर ती वस्तू कायदेशीररित्या देशात आलेली असते. […]

नेपाळ सीमेचे उत्तम रक्षण जरुरी

15 वर्षापर्यंत चीनने कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला मदत केली तेव्हा तिथल्या राजाची सत्ता जाऊन तिथे कम्युनिस्ट सत्ता प्रस्थापित झाली आहे. ही सत्ता पूर्णपणे चीनच्या बाजुने आहे. म्हणून पाकिस्तान आयएसआयच्या नेपाळमधून सुरु असलेल्या कारवायांवर लक्ष ठेवून त्यावर मात कऱणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. […]

अमेरिकेच्या अनुभवाचा वापर करुन भारताच्या सिमा सुरक्षित करा

जमिनीवरील सीमा भारतास, पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमार यांचेशी जोडतात. सीमांचे वादग्रस्त स्वरूप, सीमांची कृत्रिमता आणि सीमांची सच्छिद्रता. यांमुळे; वाढता सीमापारचा दहशतवाद.,अवैध घुसखोरी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार, डावा दहशतवाद आणि घुसखोरांच्या सीमापार हालचाली यांसारख्या बहुविध समस्या उपस्थित होतात. […]

बांगलादेशातील हिंदूंची अवस्था आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज

बंगलादेश व पाकिस्तानमध्ये अत्याचार झाल्यामुळे हे हिंदु भारतात परत येत आहेत.त्यांना अर्थातच आपण भारताचे नागरिकत्व दिले पाहिजे. आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली असा संघर्ष होऊ नये म्हणुन त्यांना आसाम सोडुन बाकी भारत बंगलादेश सिमेवर वसवले पाहिजे.जरुर पडल्यास त्यांना भारताच्या ईतर प्रांतात वसवले जावे. […]

1 67 68 69 70 71 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..