नवीन लेखन...

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

बारामुल्ला दहशतवाद मुक्त होताना..

गेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्‍या काश्मीर खोर्‍यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्‍यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे. […]

बांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी

कोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.
अफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे. […]

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गैर-मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९, लोकसभेत मंजुर करण्यात आले आहे. या विधेयकावरून लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. मात्र, तरीही ते अखेर मंजूर झाले आहे. […]

अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि त्याचा भारतावर परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच त्या क्षेत्रातील अन्य देशांची चिंता वाढविणारी आहे. सध्या त्या क्षेत्रात अमेरिकेचे १४ हजार सैनिक आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक माघारी बोलाविण्याची ट्रम्प यांची तयारी आहे. […]

सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना लष्करात काम करणे अनिवार्य करावे

पार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. […]

सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना

भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. […]

काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्‍यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. […]

प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन

प्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण असंख्य जवान हे खेड्यापाड्यातील असल्याने ते महिला कमांडरचे आदेश पाळतीलच याची खात्री देता येत नाही, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त केले. […]

अंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर

आत्तापर्यंत आपण हिंदी महासागरावरच लक्ष केंद्रित करत होतो; पण अमेरिकेने पॅसिफिक महासागरातून आपले अस्तित्व कमी करायला सुरुवात केली, तेव्हापासून हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक महासागर दोन्हींकडे भारताने लक्ष देण्यास सुरुवात केली. हे सर्व महासागर दूर अंतरावर आहेत; मात्र आपल्या दोन्ही बाजूंना असलेल्या अरबी समुद्राचे आणि पूर्व किनार्यावरील अंदमान समुद्राचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अंदमान समुद्र हा म्यानमार, दक्षिणपूर्व आशिया आणि भारत यामध्ये आहे. यापुढे तो हिंदी महासागराला मिळतो. त्या जवळच मलाक्काची सामुद्रधुनी आहे. […]

भारताची सागरी सुरक्षा – भाग २

संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे. […]

1 5 6 7 8 9 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..