नवीन लेखन...

आग्रा घराण्याचे गायक चिंतामण रघुनाथ व्यास

आग्रा घराण्याचे गायक चिंतामण रघुनाथ व्यास ऊर्फ सी. आर. व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ख्याल गायनासाठी प्रसिद्ध होते.

सी. आर. व्यासांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी महाराष्ट्र राज्यात उस्मानाबाद जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात एका संस्कृत विद्वानांच्या व हरी कीर्तनकारांच्या कुटुंबात झाला. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या गायनाचा, रामायण व महाभारतातील आख्यानांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.

त्यांनी सुरुवातीचे सांगीतिक शिक्षण किराणा घराण्याचे गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे जवळ जवळ बारा वर्षे घेतले. वयाच्या २१ व्या वर्षी व्यासांनी मुंबई गाठली व माटुंग्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करू लागले. ह्याच दरम्यान ते ग्वाल्हेर घराण्याच्या राजारामबुवा पराडकरांकडे संगीत शिकू लागले. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांचे गाणे ऐकले व त्यामुळे प्रभावित होऊन ते जगन्नाथबुवांकडे संगीताभ्यास करू लागले. त्यांना यशवंत सदाशिव मिराशी यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, कृष्ण गुंडोपंत गिंडे, चिदानंद नगरकर, एस. सी. आर. भट यांच्यासारख्या विद्वानांचे मार्गदर्शनही त्यांना वेळोवेळी मिळत राहिले.

व्यासांचा खुला, मोकळा आवाज व तिन्ही घराण्यांच्या गायकीचा मेळ यांमुळे त्यांची गायनशैली वैशिष्ट्यपूर्ण होती. तरीही त्यांच्या गायकीवर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. आकाशवाणी वदूरदर्शन वर ते आघाडीचे कलावंत होते. आयटीसी संगीत संशोधन अकादमी, भारतीय विद्या भवन येथेही त्यांनी नोकरी केली. भारतात व विदेशात त्यांनी अनेक संगीत महोत्सवांत आपले गाणे सादर केले. त्यांनी अनेक नवीन राग बांधले व बंदिशी रचल्या. त्यांनी शिव-अभोगी, शुद्ध रंजनी, संजोगिया, धनकोनी-कल्याण व इतर अनेक नव्या रागांची रचना केली व आपल्या कार्यक्रमांतून त्यांना लोकप्रियही केले. त्यांनी ‘गुणीजन’ ह्या उपनामाने २०० पेक्षा जास्त बंदिशी रचल्या. आपले गुरु गुणिदास (पं. जगन्नाथबुवा पुरोहित) यांच्या सन्मानार्थ त्यांनी इ.स. १९७७ मध्ये गुणिदास संगीत संमेलनाची सुरुवात केली. त्यांनी ‘राग सरिता’ हे पुस्तक लिहिले असून त्यावरून त्यांच्या संगीत क्षेत्रातील उदंड कार्याचा अंदाज बांधता येतो. त्यांच्या शिष्यांमध्ये प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, गणपती भट, अलका जोगळेकर व सुपुत्र सुहास व्यास यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

चिंतामण रघुनाथ व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..