नवीन लेखन...

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याच्या अदांनी घायाळ करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे.

ममता कुलकर्णीचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबई येथे झाला. नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या बोल्डन अदानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती.

तिरंगामध्ये राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्याे मुख्य भूमिका होत्या. १९९३ मध्ये आलेला चित्रपट ‘आशिक आवारा’ हा ममताचा पहिला चित्रपट हिट ठरला. याचवर्षी ममताने टॉपलेस फोटोशूट करून धुमाकूळ घातला होता. टॉपलेस फोटोशूट त्या वेळी चित्रपट इंडस्ट्री मध्ये नवी बाब होती. तिला कुणी ओळखत नव्हते. त्याळवेळी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी नव्या चेहर्याचा शोध सुरू होता. अनेक बड्या अभिनेत्रींना अशा फोटोशूटसाठी नकार दिला होता. त्या‍वेळी कुणीतरी ममता कुलकर्णीचे नाव सुचवले.

ममता यासाठी तयार झाली. परंतु, तिला जेव्हाा सांगण्यातत आले की, या फोटोशूटसाठी तिला टॉपलेस व्हावे लागणार. ही गोष्ट तिला धक्का्दायक वाटली होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द ते फोटोशूट करणारा प्रसिध्द‍ फोटोग्राफर जयेश सेठने एका मुलाखतीत केला होता. जयेशच्या माहितीनुसार, ममता टॉपलेस कव्हर शूटविषयी ऐकून म्हणाली, ‘यामध्ये खूप रिस्क आहे. मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. जर हा फोटोशूट स्वीकारला गेला तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि जर नाही स्वीकारला गेला तर माझे घरचे मंडळी आणि चित्रपट इंडस्ट्री मला बाहेर फेकून देईल. विचार केल्यानंतर ममताने हा फोटोशूट करण्यास होकार दिला. परंतु, तिने एक अट ठेवली की, तिला हा फोटोशूट आवडला तर तो प्रसिध्द होईल. अन्यथा प्रसिध्द होणार नाही. मेकर्सनी ही अट मान्य केली.

ममताने कुठलीही तमा न बाळगता टॉपलेस पोझ दिली. ममताला हा फोटोशूट आवडला आणि हा फोटोशूट मार्केटमध्ये प्रसिध्द झाला. असे म्हटले जाते की, ज्या मासिकाच्या कव्हर पेजवर ममताचा टॉपलेस फोटोशूट प्रसिध्द झाला होता, त्या मासिकाचा प्रचंड खप झाला. या फोटोशूटमुळे ममता रातोरात लाईमलाईटमध्ये आली. परंतु काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. अनेक लोक ममता कुलकर्णीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. परंतु, ममताला याचा फायदा झाला. आमिर खान, सलमान खान आणि बड्याु स्टार्सनी ममता कुलकर्णीच्या त्या बोल्ड फोटोशूटचे कौतुक केले होते. अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शक ममता कुलकर्णीला आपल्या चित्रपटात घेण्याेसाठी प्रयत्न करू लागले. येथूनच ममता कुलकर्णीला करिअरचा नवा मार्ग मिळाला. परंतु, कुणाला माहिती होते की, एकेकाळी प्रसिध्द अभिनेत्री म्हणून नाव कमावणारी ममता एक दिवस ड्रग्ज तस्करी प्रकरणात अडकेल. सुरुवातीला ममताचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचे वृत्त होते. परंतु, नंतर तिचे नाव ड्रग तस्करी करणार्या विजय गोस्वामी सोबत समोर आले. त्याच्या सोबत ती दुबई आणि केनीया मध्ये राहत होती.

ड्रग्ज तस्कर प्रकरणी विक्की तुरुंगामध्ये गेला. ममता कुलकर्णीने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगि’ नावाचा एक पुस्तक लिहिले आहे. ममताने २००२ मध्येे शेवटचा चित्रपट केला. तो चित्रपट होता – ‘कभी तुम कभी हम’. या चित्रपटानंतर ममता बॉलिवूडपासून दूर गेली. ममताचे नाव चित्रपटांपेक्षा अधिक अंडरवर्ड आणि ड्रग्ज तस्करीशी जोडले गेले. ममता कुलकर्णीचा ‘करण अर्जुन’ चित्रपट चर्चित ठरला. तिने नसीब, बाजी, सबसे बडा खिलाडी, किस्मत, आशिक आवारा, क्रांतिवीर, चायना गेट, अहंकार या सारख्या चित्रपटात काम केले. असे म्हटले जाते की, राजकुमार संतोषी यांच्याच चायना गेट चित्रपटामुळे ममता कुलकर्णी वादात अडकली होती. ममताने संतोषीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..