नवीन लेखन...

बोलणं

बोलणं म्हणजे काय तर मनातील
भावना व्यक्त करणं!अगदी साधं,
सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं
कसही असावं,पण बोलणं असावं.
शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात.
की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं….
प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत
काहींना काही चालू असत.
वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे मन गुंतण. तुम्ही जसे मनात विचार कराल तसे त्याचे पडसाद बाह्य रुपावर दिसतात. अतिशय नितळ,तरल,स्वच्छ मन असलं की तुमचं बाह्य रुप पण तितकंच सुंदर दिसतं.शांत भाव चेहेऱ्यावर उमटतो.तरीही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात.त्या व्यक्त होतात, कधी अव्यक्त राहतात…..
अंतर मन ही तर एक तरल, सुरेख जाणीव असणारी प्रकिया.त्यात फक्त भाव आणि प्रेम हेच असतं. आपण कुणाच्या मनात असणं फार सुंदर असत.आपल्या मनात अनेकांना जागा द्या! चागल्या रुपात,नक्कीच तुम्ही पण दुसऱ्याच्या हृदयात
व्यक्त होतात……
हृदय तरी असत, पण मन हा अवयव नसतो.पण मनाने जो वागतो तो मनाचा राजा.जिथं शब्दांचे सूर अलवार गुंफले जातात तिथंच हळुवार भावना जुळतात.मग शब्दांचीही गरज पडत नाही.
भाव सांगुन जातात.’शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणि घडू नये ते घडले’. खरच अतीशय सुंदर भाव की अश्या क्षणी शब्दांची गरज नसतेच….
काढला तर अर्थ नाहीतर अनर्थ,
दिसलं तर सुंदर नाहीतर कुरुप.
शोधला तर आनंद नाहीतर दुःख.
काय मिळेल जीवनात हे प्रत्येकाच्या
नशिबानुसार असतं. पण काय मिळवायचं हे तर आपल्या मनात असतं….
मन आणि अंतर मन ह्यात कुणाला स्थान द्यायचं हे एकदा ठरवलं की जीवनात आनंद मिळतो आनंद घ्यायचा, द्यायचा असतो.कधी व्यक्त होऊन कधी अव्यक्त राहून,मनातील तरल भावना ज्यात फक्त आपण आपले गुंततो तिथं व्यक्त नाही झालं तरी सहज, सुंदर असतं….
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..