नवीन लेखन...

बाईकेंचर्स अपर्णा

दुचाकी वहानांवर आत्तापर्यत पुरषवर्गाची मक्तेदारी राहिलेली आहे. आणि “बाईक राइडिंग ” यासारख्या अॅडव्हेंचर प्रकारावर सुध्दा तरण मुलांनीच वर्चस्व प्रस्थापित केलं आहे, पण अलिकडच्या काळात “वुमन बाइकर्स” ची संख्या वाढतेय आणि त्याही पुढे जाऊन आता अनेक मुली बाइक वरुन देश पालथा घालण्याचे धैर्य दाखवत आहेत, आपल्या देशात बाईकींग अॅडव्हेचर या प्रकारात मुलींची संख्या वाढण्यास यामुळे नक्कीच मदत होत असून या क्षेत्रात मुलीसुध्दा मागे नाही हे सिध्द होतयं .हाच विश्वास सत्यात उतखलाय मुंबईच्या “ डॉ अपर्णा बांदोडकर या तरुणीने ! अपर्णाच्या बाइकींग पॅशन विषयीची ही खास मुलाखत फक्त मराठी सृष्टी कॉम वर…”

लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची जरा जास्तच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा . म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा.वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे अपर्णानए एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत:ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची; त्यासाठी तिने बाईक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं, सर्वप्रथम जर कोणी अपर्णाच्या “ बाइकींग पॅशन ” ला प्रोत्साहन दिलं असेल तर ते म्हणजे अपर्णाच्या वडिलांनी. सुरुवातीला मोटरसायकल आणि मग “बुलेट” सारखा बलाढ्य बाईक वर स्वार होण्याचे प्रभुत्व मिळवले, डॉ. अपर्णा बांदोडकर यांची जिद्द इतकी होती की बुलेट वरुन जग पालथे घालायचे व तसा निश्चय देखील केला. २०१२ सालापासून वेळास, कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र, गोवा तसंच सह्याद्रीत कधी एकटीने तर कधी मित्र -मैत्रींणी समवेत बुलेट वरुन ३०० ते ५०० कि.मी चा प्रवास करण्यास सुरुवात झालट; पण सह्याद्रीपेक्षा ही डॉ.अपर्णा बांदोडकरला खुणावत होती हिमालयाची शिखरे आणि त्याच परिसरात बुलेटने प्रवास करायचा अशी खुणगाठ तिनं मनाशी बांधली व “ लडाख ”ला जाण्यास ठरवल. अगदी सुरुवातीपासून अपर्णाच्या मनात कुठेतरी आपल्या प्रवासाविषयी सकारात्मकता होती कारण ३,५००कि.मी असा मुंबई -लडाख प्रवास सुरु करण्याअगोदर बरीच मानसिक, शारिरीक तयारी केली होती; या लडाख प्रवासा विषयी डॉ. अपर्णा अगदी भरभरुन बोलतात `खरतर लडाख चा प्रवास रस्ताच्या मार्गाने कारण म्हणजे विलक्षण अनुभव देणारा क्षण, अतिशय चित्तथरारक साहसी आणि धाडसी सुध्दा ! कारण उत्तरेकडील अनेक दुर्गम भागात बर्‍याच मुलभूत गरजाचा अभाव पहायला मिळतो. त्यात ही मुलगी जर एकट्याने प्रवास करत असेल तर बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो, पण माझ्या सुदैवाने लडाख प्रवासाच्या वेळी, मी ज्या-ज्या भागातून गेले त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी मला सहकार्य करुन सलाम केल्याचं” डॉ. अपर्णा बांदोडकर आवर्जुन सांगतात, `कुठे मला पुरुषांनी भरुभरुन दाद दिली तर कधी गावातल्या काही महिलांनी मलाही आपल्या सारखेच धडाडी बनायचय असं बोलून दाखवलं, कुठेतरी प्रोत्साहन मिळत गेल्याची भावना असल्यामुळे लडाख प्रवास सुखकर बनाल्याचं त्या सांगतात.”
एक स्त्री बाईकर म्हणून आपल्या देशात कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले का? या प्रश्नावर डॉ. अपर्णा बांदोडकर उत्तरतात की `असे प्रसंग क्वचितच कधी आले असतील; पण मुली अॅडव्हेचर्स असू शकतात ही संकल्पना आजही आपल्याकडे रुळलेली नाही; दुसरा मुद्दा अहे सुरक्षेचा !काही अशी तरी आजही भारतात महिला एकट्याने प्रवास करण्यास असुरक्षित असल्याचं” त्या अनुभवातून कथन करतात; ` लडाखप्रवासात एका टप्यावर कुठेतरी बाइकने वळण घेताना माझ्याकडील वॉलेट देखील खिशातून सटकले हे लक्षात येताच खुप काही गमावल्याचं नातं आलं पण अश्या स्थितीत न खचता सर्वतोपरीने ते शोधण्याचे कसब माझ्या समोर होते अखेर एका जवानाच्या मदतीने ते शक्य झाले .! हा प्रसंग सांगताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत असतो.
डॉ. अपर्णानी केवळ बाईक चालवण्याचे जुजबी प्रशिक्षण घेतलं नसून त्यामध्ये असणार्‍या तांत्रिक बाबी देखील समजून घेतल्या म्हणजे जर का अडचणची स्थिती उदभवली तर काय करता येईल हे पण माहिती करुन घेतले.
भारतात मुलींनी देखील बाइक्स शिकण्याची गरज असल्याचं मत डॉ अपर्णा बोलून दाखवतात, कारण अॅडव्हेंचर अॅक्टी्व्हीटीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची संख्या वाढत जाणार आहे, आणि मुलींसाठी एक उत्तम करियर ठरु शकेल असं त्याना वाटतं.
बुलेट वरुन तुम्हाला कुठे अॅडव्हेचर करायला आवडेल? यावर डॉ. अपर्णा बांदोडकर सांगतात की “साऊथ इस्ट एशियात बाइक राइडिंग करायला आवडेल तर आगामी काळात इंडो-नेपाळ-चायना बॉर्डरला बुलेटनं जाणार असल्याचं त्या पुढे म्हणाल्या.
प्रवासा दरम्यान एक स्त्री बाइकच्या माध्यमातून आपलं अॅडव्हेंचरचं स्वप्न पूर्ण करत आहे `हा संदेश आपसूकच पहाणार्‍याच्या मनामध्ये स्त्रीविषयीची आदरभावना व्यक्त करणारा ठरत असल्याचं’ त्या पुढे सांगतात.
डॉ. अपर्णा बांदोडकरच्या बाइक आणि अॅडव्हेचरच्या प्रेमाचं तिच्या पतींना आणि सासरच्या मंडळींना आपली सुनही नवोदित तरुणींसमोर आदर्श निमार्ण करत असल्याचा आनंद त्यांच्या मनात आहे. व्यवसायाने डेंटिस्ट असणार्‍या डॉ. अपर्णा बांदोडकरने गृहिणी तसंच व्यावसायिक जीवनातली आघाडी अगदी उत्तमरित्या सांभाळली आहे.
डॉ. अपर्णाच्या “बाइकींग” विषयी असणार्‍या पॅशनची दखल बी.बी.सी. वर्ल्ड” ने घेतली असून त्यांच्यावर काही मिनिंटांची डॉक्युमेंट्री बनवण्यात आली होती. असं आगळं-वेगळं आणि चाकोरीबाहेरची “अॅडव्हेंचर अॅक्टीव्हीटी” मनापासून जोपासणार्‍या डॉ. अपर्णा बांदोडकरांना महिला बाइकर म्हणून मिळणारी ख्याती तमाम महिला वर्गाची मान उंचावणारी आहे.

संपादक – निनाद प्रधान

तांत्रिक सहाय्य – सुमित्र माडगूळकर

संकल्पना, निमिर्ती व संकलन – सागर मालाडकर

निर्मिती सहाय्य – मनिषा सकपाळ

छायाचित्र संकलन – पुजा प्रधान, आदित्य देशपांडे आणि सागर मालाडकर

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..