नवीन लेखन...

बाहेरून नागपूरले येणार्‍या लोकायसाठी जरूरी सूचना

बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना

१. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात.

२. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते.

३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन.

४. आम्ही दुपारी एक ते चार ट्रॅफिकचे नियम पाळत नाई. कारण विचारू नये. तुम्हाले उत्तर दयाले आम्ही दबेल नाही.

५. इथल्या लोकायसमोर उगाच तुमच्या श्रीमंतीचा ताव मारू नये. तुमच्या पैशात आम्हाले जरासा बी इंटरेस्ट नाही.

६. मुम्बई अन् पुणेवाल्यांनी तर आम्हाले काम कमी करणारे आळशी म्हनू नये. आम्ही कितीही रिकामचोट असलो तरी तुमच्यापेक्षा पोटभर जेवतो.

७. नागपूरवाल्यायले अविकसित समजू नये. मनाची श्रीमंती हाच आमचा विकास.

८. नागपूरातल्या पोरी तोंडाले फडकं बांधून फिरतात म्हणून उगाच दात दाखवू नये. तो आमचा खाजगी प्रश्न आहे. अन् तुम्हाले तोंड दाखवाची जबाबदारी अजून आम्ही घेतलेली नाही.. समजलं..?? नाहीत् भर मे महिन्यात कामठी रोडावर नंग्या पायानं चालाची शिक्षा करण्यात येईल.

९. आमच्या भाषेले अजिबात हासाचं नाही. तुम्ही जर मराठीत विचारलं त् मराठीतच उत्तर भेटन. आमच्या भाषेत ‘का बे ‘ चा अर्थ ‘काय दादा’ असा होते.

१०. आमच्या रंगावर बिलकुल जायचं नाही. मूळचे आम्ही गोरेच आहो. हा इथल्या उनाचा परिणाम आहे.

!! धन्यवाद भाऊ.. दे खर्रा!!

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on बाहेरून नागपूरले येणार्‍या लोकायसाठी जरूरी सूचना

  1. एकचं नंबर सर अवडलंय आपल्याले. भाषा हि भाषा असते अन नागपूरचा लोकनले प्रमाण भाषेची काही गरज नाही . जय विदर्भ

Leave a Reply to indrajit vijay Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..