आयुष्यावर बोलू काही……

सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का??

हो महित आहे,आता तुम्ही बोलाल दुःख विसरुन आनंदाने जगा बोलायला सोपे आहे पण करायला सोपे नाही.बरोबर आहे तुमचे ,नाही आहे ते सोपे कारण आपण कितीही विचार केला की विसरुन जायच दुःख पण आपले  मन त्याला कोण समजावणार,आपला मेंदु त्याला विचार करण्यापासून कोण थांबवणार……पण याच उत्तर आहे माझ्याकडे.आपण स्वतः आपल्या मन आणि मेंदु ला ताब्यात ठेवू शकतो,आपण काहीही करु शकतो.जर हे मन आणि मेंदु आपल्याला दुःखाची जाणीव करून देऊ शकतात तर हेच आपल्याला त्यावर मात करायला मदत करु शकतात.बस फक्त आपल्याला त्यांना तस घडवाव लागेल, तर ते कस घडवायच ते मी सांगते तुम्हाला……

  • सगळ्यात आधी तर दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करणे सोडून दया.आपण सगळे वेगळे आहोत,प्रत्येक गोष्टीत वेगळे आहोत रंग ,रूप ,विचार ,कौशल्य ,शौर्य ,आवडी निवडी  म्हणून स्वतःच वेगळेपण जपा.त्या मनाला सांगा की मी वेगळा आहे,माझी कार्य वेगळी आहेत आणि आज नाही तर उद्या मी हे करून दाखवणारच.
  • आता मनाला सांगितले आहे आपण की करून दाखवणार,मग मेंदु ला त्याची दखल घेऊ दया.योजना आखु दया,आत्मसात करु दे त्याला तुमचा हा बदल,तुमचा तो आत्मविश्वास.
  • या सगळ्या मार्गांमधे तुम्हाला खुप शत्रूंना सामोरे जायचे आहे.पहिला म्हणजे आळस.हा आळस तुम्हाला तुमच्या ध्येयपासून दूर ठेवायचा खुप प्रयत्न करेल तिथेच जर तुम्ही हराल तर पुढचा मार्ग कठीण होऊन जाईल म्हणून त्याला शक्य तेवढ दूर ठेवा.
  • पुढचे शत्रु म्हणजे आपलीच काही माणस.नकारात्मक माणसाकडून आलेला फक्त एक विचार पण पुरेसा आहे तुमची पूर्ण मेहनत वाया घलवायला,पण जर तुमच मन आणि मेंदु भक्कम असेल तर असे १०० लोक आले तरी तुमच काही बिघडवू शकत नाहीत .पण तरीही मी बोलेन आयुष्यामधे चांगली माणस सोबत असण खुप महत्त्वाचे आहे.नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा ज्यांचाकडून आपल्याला चांगली प्रेरणा मिळेल.जे आपल्याला प्रोत्साहन देत राहतील.
  • नेहमी स्वतःला प्रोत्साहित करत राहा.प्रोत्साहन देणारे लोक खूप कमी असतात आणि तसे तुम्हाला भेटले तर खरच तुम्ही खूप नशिबवान आहात.आपण पण दुसऱ्याांना नेहमी प्रोत्साहन देऊन त्यांना नशिबवान करायला हव,नाही का?? आपणच नेहमी आपल्यासाठी पुरक असायला हव.जर कोणी नसेल प्रोत्साहन द्यायला तर आपण स्वतः आहोत की पुरे… पुरे आहे तेवढ़. प्रत्येक दिवसासाठी स्वतःला प्रोत्साहन दया त्याने नेहमी एक नवीन उमेद तुमच्यासोबत राहील आणि तुम्हाला सकारात्मक करेल.
  • आपल्यात एक जादू आहे काहीपण करून दाखवयची हे फक्त लक्षात ठेऊन तुम्हाला तुमच्या मनाला आणि मेंदूला कार्यान्वित ठेवायचे आहे.बस मग हे साध्य झाल तर तुम्हाला अजुन काय पाहिजे….

जे लिहले आहे त्याचा नक्की विचार करा तुम्ही एकटे नाही आहात संकटांमधे आम्ही सगळे आहोत,प्रत्येकजण असते … पण जे धैर्याने त्याला सामोरे जातात,न डगमगता तोच खरा आयुष्य जगला..

जर फक्त सुख असत ना आयुष्यामध्ये , तर मज्जा पण आली नसती  आयुष्य जगायची  म्हणजे आपल्याला सुखाची किंमत राहिलीच  नसती.

म्हणून जे आयुष्य देवाने दिलेले आहे त्याचा आस्वाद घ्या,आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंद दया.

या विचारांनी तुम्हाला जगायची नवीन उमेद मिळावी अशी आशा करते.

— अपूर्वा रविंद्र जोशी Avatar
About अपूर्वा रविंद्र जोशी 4 Articles
मी अपूर्वा जोशी. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. मला लोकांना प्रभावित करणाऱ्या, त्यांच्या समस्यांच उत्तर देणाऱ्या, त्यांना चिंता मुक्त करणाऱ्या, त्यांना आयुष्य जगण्याविषयीचे महत्व कळून देणाऱ्या विषयांवर लिहायला आवडत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…