आयुष्य – सिनेकलाकारांची सांगड

आपल्यापैकी काही जणांना माझ्यासारखं सिनेमाचं आणि त्यातल्या त्यात संगीतकार , गायक व सिनेकलाकारांचं वेड असतं. आणि कधी कधी ते इतकं असतं की आयुष्याशी पण अशा सिनेकलाकारांची सांगड घातली जाते ! अशीच सांगड घालणारी एक कल्पना मांडली आहे ( ५ सप्टेंबर २००५ ला ! ) खालील कवितेत , बघा पटते का…..

आज २१ जानेवारी : गीता बालीचा पुण्यस्मरण दिन ! या निमित्ताने आज पोस्ट करतोय……

आयुष्य तेंव्हा सायरा बानो सारखं असतंस
इकडून तिकडे उंडारण्याचं , चकाट्या पिटत फिरण्याचं
जेंव्हा आपलं वय एक ते चार असतं ! ॥१॥

आयुष्य मग गीता बाली सारखं होतं
पुष्कळ वेळ बागडण्याचं
मग पुस्तकांशी झगडण्याचं
जेंव्हा आपलं वय पाच ते आठ असतं ! ॥२॥

इयुष्य झटकन डोलणार्‍या वहिदा सारखं होतं
क्षणांत गिरकी घेण्याचं
बर्‍याचदा फिरकी घेण्याचं
जेंव्हा आपलं वय नऊ ते बारा असतं ! ॥३॥

आयुष्य आता नूतन सारखं होतं
प्रसंग कित्येक हसण्याचे
अपुर्‍या प्रयत्नांनी फसण्याचे
जेंव्हा आपलं वय तेरा ते सोळा असतं ! ॥४॥

आयुष्य आपसुक रसाळ , शर्मिला सारखं होतं
क्षण न् क्षण आवडण्याचं
कशाचीही भुरळ पडण्याचं
जेंव्हा आपलं वय सतरा ते वीस असतं ! ॥५॥

आयुष्य आता विद्या सिन्हा सारखं होतं
प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं
कुठेतरी टिकायला धडपडण्याचं
जेंव्हा आपलं वय एकवीस ते पंचवीस असतं ! ॥६॥

यानंतरचं आयुष्य मात्र मधुबाला सारखं होतं
कधी अवखळ — कधी शांत
कधी काय होईल? याची भ्रांत
कधी हौसे—मौजेनं मुरडण्याचं
तर कधी हौस गरजेपाई खुरडण्याचं !
जेंव्हा आपलं वय सव्वीस ते “कितीही” असतं ! ॥७॥

© उदय गंगाधर सप्रे म — ठाणे
E-mail : sudayan2003@yahoo.com
सेल फोन : +९१९००४४१७२०५ (संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…