आयुर्वेदीय औषधे आणि प्रथमोपचार

आजची औषधी : कुमारी (कोरफड)

● कोरफड ही कडू चवीची आणि शीतवीर्य (थंड गुणात्मक) असल्यामुळे उत्तम पित्तशामक आहे.

● अम्लपित्तासारख्या त्रासात कोरफडीचा गर खाल्ल्याने पित्त मलावाटे बाहेर पडून जाते. आयुर्वेदामध्ये यालाच ‘पित्त विरेचन’ म्हणतात.

● बद्धकोष्ठता / पोटात मळाचे खडे होत असल्यास कोरफडीच्या गर / रसामुळे खडे फुटून पोट साफ होते. कोरफड घ्यायचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या कोठ्यानुसार बदलावे लागते.

● डोळ्यांची आग होणे , पाणी येणे अशा तक्रारींवर कोरफड उपयुक्त आहे. यासाठी कोरफडीचा गर डोळ्यांवर रोज दहा मिनिटे ठेवावा. पोटातही घ्यावा.

● पित्तासोबतच कोरफड वातशामक , विषघ्न व पाचक आहे.

● पचनक्रिया सुधारणारी असल्यामुळे रोज थोड्या प्रमाणात कोरफडीचा रस घेतल्यास शरीर बळकट बनते.

● सर्व प्रकारची पोटदुखी , विशेषतः यकृत-प्लीहा यांना सूज असेल , तर कोरफड खाल्ल्याने निश्चितच उपयोग होतो. म्हणूनच , काविळीवर कोरफड हे जालीम औषध आहे.

● जुनाट , बारीक ताप / कणकण अंगात असल्यास कोरफडीने तो ताप निघून जातो.

● चेहर्‍याची कांती सुधारण्यासाठी ; त्वचा कोरडी , खरखरीत झाली किंवा सुरकुत्या पडत असल्यास कोरफडीचा ओला गर लावून वाळेपर्यंत ठेवावा व नंतर धुवावा.

● त्वचा आणि रक्तातील दोषांमुळे होणारे खरूज , फोड , खाजेसारख्या सर्व त्वचारोगांमध्ये कोरफड पोटात घेतल्याने उपशय मिळतो.

● स्त्रियांमध्ये पाळी पुढे पुढे जाणे , प्रमाण कमी असणे , कंबरदुखी अशा सर्व तक्रारींमध्ये कोरफड पोटात घ्यावी.

● पोटात जंत झाल्यामुळे भूक न लागणे , अपचन , खाज , पोटदुखी अशी लक्षणे असताना लहान-मोठ्या सर्वांनीच कोरफडीचा रस घ्यावा.

● निरोगी व्यक्तीनेसुद्धा कोरफडीचा रस नियमित घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.

● लहान मुलांना लागणारा दमा , धाप , खोकला व अधिक कफ झाला असल्यास कोरफडीचा रस द्यावा.

● मुका मार लागून रक्त साकळल्यावर याचा लेप लावावा.

● मात्र , जुनाट मुळव्याधीसारख्या विकारात अंग बाहेर येत असल्यास ; गर्भावस्थेमध्ये , अति वृद्ध व्यक्ती , ज्या महिलांना पाळीचे प्रमाण जास्तच असते , अशांनी कोरफडीचा वापर करू नये.

[ टीप – सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]

डॉ. अमेय गोखले 
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)

(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरुन साभार) About Guest Author 507 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…