नवीन लेखन...

ऑक्सि बँक

|| हरी ॐ ||

मी एकदा बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा होतो तेवढ्यात दोन मित्र बसस्टॉपवर आले आणि त्यांच्या गप्पा रंगल्या गप्पांचा विषय होता वायूप्रदूषण. एक मित्र दुसऱ्या मित्रास म्हणतो की वायुप्रदूषण असेच वाढत राहिले तर काही वर्षांनी आपल्या सर्वांना तोंडाला मास आणि पाठीवर एक ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्याची वेळ येईल आणि रिकामे झालेले सिलिंडर रिफील करण्यासाठी एटीओ (ऑल टाईम ऑक्सिजन) मशीन्स जागो जागी ठेवावी लागतील. असो.

अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?

‘सीर सलामत तो पकडी पचास’ या उक्ती प्रमाणे आपल्या प्रत्येकाची तब्बेत ठीकठाक असल्यासच आपल्याकडे असणारा पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि सगळ्या सुखसोयी उपभोगू शकणार आहोत. त्यासाठी आपल्याला मोकळा श्वास तोसुद्धा शुध्द आणि चांगल्या वातावरणात घेता आला पाहिजे तरच सर्व शक्य आहे. असे वायुप्रदूषण युक्त हवेतील श्वासोच्छ्वास करण्याने आपले जीवन सुखी कसे होणार?

जीवनात सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यासाठी आपण सर्व रोज काहीना काही उद्योग-व्यवसाय करून पैसे मिळवत असतो आणि त्यातून काटकसर करून काही पैसे आपण आपल्या भविष्यातील आर्थिक तरतुदीसाठी बँकेत जमा करीत असतो. ज्यामुळे भविष्यात आर्थिक चणचण भासली तर ते पैसे उपयोगात आणता येतात. पण हेच पैसे बँकेतील खात्यात जमाच केले नाहीत तर काय? भविष्यातील आर्थिक अडचणींवर कशी मात करता येणार?

वायुप्रदूषणावर मात करण्यासाठी एकतर ते कमीतकमी कसे होईल याची खबरदारी घेऊ किंवा ते कमी करण्यासाठी उपाय शोधू. असाच एक उपाय म्हणजे ऑक्सि बँक (ऑक्सिजन बँक) वाढत्या वायुप्रदूषणामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण कमी करून हवा जास्तजास्त शुध्द ठेवण्याचे या बँकेमुळे मदत होईल. जर बँकेत काही शिल्लक असेल तर अडचणीच्या वेळी ते उपोगात आणता येईल पण काहीच नसेल तर? यासाठी आपण प्रत्येकाने ऑक्सिजन बँकेत खाते उघडले पाहिजे. जसं आपण आपल्या मुलाबाळांना जन्म देतो, त्यांच्यावर चांगले संस्कार करतो, चांगले चुंगले खायला घालतो, चांगले शिक्षण देतो आणि आदर्श नागरिक निमार्ण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करतो. तसेच प्रत्येकाने ऑक्सिजन बँक उघडून त्यात आपले खाते उघडण्यासाठी आणि त्यात रोज भर घालण्यासाठी आपण लतावेली, छोटी छोटी झाडे, झुडपे लाऊन त्यांना वाढवून, त्यांचीही आपल्या मुलाबालांसारखी काळजी घेऊन त्यांची निगा राखून त्यांच्यावर आपल्या मुलांसारखे प्रेम करून चांगले संस्कार करून आपलेसे केले तर तेही भविष्यात आपल्या वायू प्रदूषणाचे संकट टाळण्याचा प्रयास करतील. (जसे आपण आपल्या मुलाबाळांना म्हातारपणीची काठी समजतो) हीच आहे आपली ऑक्सि बँक आणि त्यात झाडं लाऊन उघडलेली प्रत्येकाची खाती. आपली भविष्यातील ऑक्सिजनची गरज नक्की भगवतील. आपल्या परिसरात तुळस, कडुलिंब, वड, पिंपळ अशी हवा स्वच्छ ठेवणारी आणि उन्हाळ्यात डेरेदार वृक्षापासून आपल्याला सावली मिळते. पण आणि परंतूमध्ये न अडकता भविष्यात येणाऱ्या काळासाठी आत्तापासूनच तरतूद करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात भारताच्या पंतप्रधानानी जन-धन योजनेची घोषणा केली होती आणि ही योजना जनतेपर्यंत योग्यारित्या पोहोचविण्यासाठी जसे विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्याच धरतीवर वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी ऑक्सि बँकेचे खाते उघडण्यासाठी, त्याचे महत्व या जन-धन योजने इतकेच किंबहुना याहून त्याचे महत्व आणि उपयोग कसे आपल्या सर्वांसाठी अधिक आहे याची माहिती करून देण्यासाठी ही योजना आणि विषय लोकांपार्यात जनजागृतीने पोहोचविण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याची जरुरी आहे.

हल्ली पावसाळ्यातील सहली या बऱ्याच वेळेस डोंगर कपारीतील धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी करण्यात येतात. अश्यावेळेस आपल्या बरोबर विविध झाडांच्या बिया उदा. वड, पिंपळ, चिंच, आंबा, आणि फणस यांच्या बिया सर्वत्र टाकल्या तर उघड्या बोडक्या डोंगरांवर भविष्यात डेरेदार वृक्ष उगवतील. याने जमिनीची धूप सुद्धा थांबेल, तसेच औषधी वनस्पतींची लागवड होईल आणि त्यापासून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळेल. जी भविष्यात काळाची गरज असणार आहे. प्रत्येक वनस्पती, झाडे, झुडपे ही सर्व ऑक्सिजनच्या बँका आहेत. त्यांची योग्यती काळजी घेणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. बँकांवर कधीही दरोडा पडण्याची शक्यता असते तर त्याची आपण सर्व पहारेकरी बनून काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपल्यावर अशी पाळी येईल की आयुर्वेदशास्त्र भारतात जन्माला आले पण ते टीकाविण्यासाठी लागणारी वनस्पती, झाडं झुडपं नसल्याने औषधच बनविणे शक्य होणार नाही आणि यासाठी आयुर्वेदिक औषधाचे कच्चे पदार्थ परदेशातून आयात करून औषध बनविण्याची पाळी येईल आणि भविष्यात हे शास्त्र फक्त पुस्तकातून वाचावे लागेल. काय तर मग उघडणार ना ऑक्सि बँकेत खाते आणि वाचवणार ना वायुप्रदूषणापासून आपल्या सुंदर वसुंधरेला आणि तिच्या बाळांना?

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..