शंभर वर्षांपुर्वीचं गिरगाव
मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे. […]
