नवीन लेखन...

खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका

खासदारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या विरोधात जनमताचा रेटा तयार व्हावा, याकरिता पुण्यातील सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. जागरूक नागरिकांनी त्यास पाठींबा देण्याची विनंती केली आहे. आपण ही त्यास पाठींबा द्यावा ही विनंती . […]

शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र

अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षापासून सरकार, नोकरशाही, शिक्षणतज्ज्ञांनी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार केली आहे. कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे. आपणा कडे कांही योजना असल्यास आपण ही सादर कराव्यात. […]

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल . […]

आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.

जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..