नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २८

यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् | तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖ याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना. “अंत भला तो सब भला” ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक. आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत. ते म्हणतात, श्वेतपत्रायत […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २७

यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् | तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖ सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २६

यदापारमच्छायमस्थानमद्भि- र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् | तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖ यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात. किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात, यदा – ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील, अपारम् – प्रचंड […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २५

यदा यातनादेहसंदेहवाही भवेदात्मदेहे न मोहो महान्मे | तदा काशशीतांशुसंकाशमीश स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖ मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत. येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात, यदा – ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी, यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २४

यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान् अयं श्वास एवेति वाचो भवेयुः | तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖ अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत. आचार्यश्री म्हणतात, यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २३

यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति | तदा देवदेवेश गौरीश शंभो नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖ भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे. भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २२

यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः | तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖ मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे. अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २१

यदा दारुणाभाषणा भीषणा मे भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः | तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖ जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २०

यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः | वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖ प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत. एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे. ते म्हणतात, यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल, कालवाह – म्हणजे भगवान यमराजांच्या […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १८

भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने | शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖ शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत. हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान […]

1 19 20 21 22 23 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..