नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

आम्ही स्वतंत्र आहो

(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।। ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। प्रगतिचें नांव […]

पंचपदी (लिमरिक)

आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’ इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’ इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली . – सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे – (4)

साहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो  घनघोर मी  ।। -सुभाष स.नाईक

फवारे हास्याचे – (3)

पांडेजी बसले पंगतीला चेलेही होते संगतीला खाउन भरपुर पांडेजींनी ग्लास ग्लास रिचवले पाणी . ‘आता भरपेट जेवणार कसे? ’ एक चेला त्यांना पुसे. ‘पाणी शिंपडल्याने वरती खाली दबली जाते माती. तसेच पाणी पिऊन घडते दबते जेवण, जागा होते. आता पहा रिचवीन भराभर ताटातिल भाताचे डोंगर’. -सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे – (२)

ग्लास भर whisky थेंबभर पाणी असे ग्लास मी सात-आठ  ‘हाणी’ त्यानंतर झाले आजार डॉक्टरने केले बेजार हे खा, ते घ्या,  हे नको कंटाळून गेली बायको तरी अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला . – (हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें  ) सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे (१)

पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . – (चिंगम – च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक  

आम्ही स्वतंत्र आहो

(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।। ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। प्रगतिचें नांव […]

साहित्यिक

साहित्याचा चोर मी पण साहित्यिक थोर मी वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी लढतो की घनघोर मी ! – – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)

टोरली ( एक लिमरिक )

एक होती टोरली, होती भली-थोरली ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी – ‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ? – – – टोरली : Trolley – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)

थेंबभर

ग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी रोज ग्लास मी सात-आठ हाणी होणारच, झाले आजार डॉक्टरनें केलें बेजार ‘हें खा, तें घ्या, तें नको’ कंटाळुन गेली बायको तरिही अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला. – हाणणें : भरपूर रिचवणें हाला : मद्य – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)

1 6 7 8 9 10 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..