मास्टर चंदगीराम
चंदगीराम गेले. भारतीय कुस्तीमधील एक महान पर्व संपले. सहा फूट उंचीचा, १९० पौण्ड वजनाचा आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांना जिंकणारा पैलवान अनंतात विलीन झाला. त्याने भारतीय कुस्ती क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटविला होता. १९७०च्या बँकॉक एशियाडमध्ये भारताला १०० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या महान कुस्तीगीराने भारतातील ‘हिंद केसरी’, ‘महाभारत केसरी’, ‘भारत भीम’, ‘रुस्तम ए हिंद’, […]
